श्री.उद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात खाऊ वाटप आणि वृक्षारोपण

मावळ मराठा न्युज – लोणावळा,महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा.श्री.उद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक २७ जुलै ,२०२६ वार सोमवार रोजी शिवसेना लोणावळा शहर व मावळ तालुक्याच्या वतीने भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा क्रमांक ०५ येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच शिक्षकांना शॉल व तुळशी वृंदावन देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी वृक्षारोपन देखील करण्यात आले.यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, नगरसेवीका महिला शहर आघाडी संघटीका सना चौधरी, पुणे जिल्हा सल्लागार मारूती खोले, तालुका सल्लागार बबनराव अनसुलकर, शिवसेना लोणावळा शहर संघटक शाम सुतार,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, शिवजयंती अध्यक्ष सचिन इंगुळकर,उपशहर प्रमुख उल्लास भांगरे,खंडाळा विभाग प्रमुख अशोक गवराने,उपविभाग प्रमुख विनोद पिल्लणे,शाखा प्रमुख संजय जाधव,जितेंद्र ठोंबरे,उत्तम ठाकर,कुणाल सपकाळ,सुमित भोसले,धीरज घारे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितहोते. तसेच यावेळी सौ वैजयंती ताई म्हाळस्कर (मुख्यध्यपिका)सौ शीतल अहिरे,सौ ज्योती चव्हाण,सौ स्वप्ना बागडे,सौ आयेशा शेख,सौ मनीषा लालगुडे, सौ पिसे मॅडम शाळेतील शिक्षक आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page