अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारीता सन्मान सोहळा मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न








मावळ मराठा न्यूज़- मुंबई,८७ वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारीता सन्मान सोहळा मुंबईत उद्धव ठाकरे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार श्री. हेमंत देसाई यांना देण्यात आला.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या मिडिया परिषद डिजिटल मीडिया परिषद च्या वतीने श्री. प्रशांत कदम,अनुराग त्रिपाठी,जान्हवी मुळे,संतोष आंधळे,सुनील पाटील,महेश तिवारी,अभय देशपांडे,सचिन परब, बापूसाहेब जाधव आदि मान्यवर पत्रकारांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांनी पत्रकारांच्या समस्या आणि परिषदेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला.उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना आजच्या गोदी मीडियाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत पत्रकारांची आणि विरोधी पक्षाची एकसारखी परिस्थिती झाली आहे कारण सत्ताधारी पक्षांच्या विरोधात बोललं कि देशद्रोही म्हटलं जातं,त्यामुळे पत्रकारांनी पुढे येणं खूप गरजेचे आहे आणि सरकारच्या या मनमानी आणि हुकूमशाही विरोधात आपल्याला एकत्र लढा द्यावा लागणार असल्याचे मत व्यक्त केला.तर जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी देखील पंतप्रधान मोदी यांनी अघोषित हुकूशाही सुरु असल्याचे सांगितले. मुबंई येथील यशवंतराव चव्हाण सेन्टर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राज्यातून विविध भागातून आलेल्या पत्रकारांनी संपूर्ण हॉल भरगच्च भरला होता.



