शिवजयंती निमित्त ओवळे येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना श्री.म्हसोबा भक्तांच्या वतीने शालेय साहित्य
मावळ मराठा न्युज:- ओवळे,मावळ शिवजयंतीनिमित्त ओवळे येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना श्री.म्हसोबाभक्तांच्या वतीने शालेय साहित्य पाटी/पेन्सिलचे वाटप करण्यात आले.तसेच यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी केली असुन ,येत्या वर्षभरात शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे मत येथील श्री.म्हसोबा भक्त आणि सामाजिक कार्यकर्ते अजित शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका-सौ.सुजाता साठे,आशासेविका-सौ.उर्मिला इंगळे तसेच शालेय विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.