लोणावळ्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने,टाळ बोले चिपळीला हा भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न; सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त काही कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप









मावळ मराठा न्युज – लोणावळा,मेहता म्युझिकल चे सौ उमा मेहता व राजेश मेहता यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभंगवारीमध्ये मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते …या कार्यक्रमात गायक राजेश मेहता, आर्या बांदल, संतोषी बांदल, जया गोडबोले, अशोक साळवे यांनी सुंदर भक्तिगीते सादर केली व भक्तिरसात श्रोते न्हाऊन गेले. श्री बापूलाल तारे यांनी उत्कृष्ठ निवेदनाने पंढरपूर डोळ्यासमोर साकारले. या कार्यक्रमात विविध भक्ती गीते सादर करण्यात आली…आरंभी वंदीन, विठ्ठल आवडी प्रेमभावे, कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल, माझे माहेर पंढरी, टाळ बोले चिपळीला ( राजेश मेहता )देव माझा विठू सावळा, घागर घेऊन , सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, खेळ मांडियेला, रखुमाई रखुमाई ( आर्या बांदल )जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, पांडुरंग कांती, विश्वाचे आर्त ( संतोषी बांदल )केशवा माधवा, रंगा येई ओ – ( जया गोडबोले )विठू माऊली तू , पंढरपुरात – ( अशोक साळवे )या कार्यक्रमात नुकत्याच लोणावळ्यात अतिवृष्टीने आलेल्या पुरात नुकसान झालेल्या काही कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले..



