*आंतरराष्ट्रीय अवयव दान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्या बद्दल पैलवान काळुराम लांडगे यांचा सन्मान*

मावळ मराठा न्युज – पिंपरी,*”अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती”*पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे प्रतिपादनआंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम व महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेल्या गुणवंत कामगारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र,उद्योग नगर येथे (गुरुवार,दि.१३ ऑगस्ट २०२६) करण्यात आले होते. गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुणे,अवयव दान जनजागृती करणारे व्याख्याते श्रीकांत आपटे, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योगनगरचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे होते. याप्रसंगी माजी केंद्रप्रमुख सुरेश पवार,कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे,राजेश हजारे,महेंद्र गायकवाड,सुरेश कंक, अण्णा गुरव,उद्धव कुंभार, भरत शिंदे,श्रीकांत कदम, प्रकाश चव्हाण,शंकर नाणेकर,अशोक सरतापे, शिवाजी पाटील या गुणवंत कामगारांची प्रमुख उपस्थिती होती.पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले,”अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती होय.कारण अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयवदान आधिक श्रेष्ठ आहे.म्हणून गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयव दान जनजागृती करावी.”व्याख्याते श्रीकांत आपटे म्हणाले, “मृत्यूनंतर अवयव दान केल्याने एक जीव वाचतो.मग ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे ‘ हे वाक्य सार्थ ठरते. अवयव दानाविषयी समाजात असलेली अंधश्रद्धा निपटून काढणे अन् सकारात्मक प्रचार करणे हे कार्य गुणवंत कामगारांनी करावे.”महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे म्हणाले, “पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गुणवंत कामगारांनी आगामी काळात अधिक जोमाने काम करणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ निश्चित सहकार्य करेल.!”त्याप्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण म्हणाल्या,”गुणवंत कामगारांनी सर्वसामान्य माणसांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असावे. अवयवदान हा विचार कृतीत येण्यासाठी प्रचार अन् प्रसार करणे याची सुरुवात आपल्यापासून करणे आवश्यक आहे.!” याप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेले गुणवंत कामगार वसंत कोल्हे, काळूराम लांडगे,किरण देशमुख,बाळासाहेब साळुंके,शिवाजी पाटील, दत्तात्रय गायकवाड यांचा स्मृतिचिन्ह आणि शॉल देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. संदीप रांगोळे,पांडुरंग सुतार,डी पी देशपांडे, अरुण कळंबे,अक्षय काटे, कैलास पाटील,मुस्तफा मुलानी,संतोष कोरडे, नंदकुमार धुमाळ,सुरेश शेडगे,धनंजय सावंत,रवी मेश्राम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.प्रास्ताविक गुणवंत कामगार महंमद शरीफ मुलाणी यांनी केले. सूत्रसंचालन शिवराज शिंदे तर मंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page