लोणावळ्यात कैवल्यधाम योग संस्थेचा गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालय सांस्कृतिक व समन्वय”चा वार्षिक दिन साजरा

मावळ मराठा न्युज -लोणावळा,जागतिक कीर्तीच्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेमधील “गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालय सांस्कृतिक व समन्वय”चा वार्षिक दिन शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी प्रमुख पाहुणे महासंसदरत्न, मावळ लोकसभा मतदारसंघचे खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेमधील “गोवर्धनदास सक्सेरिया योग महावि‌द्यालय सांस्कृतिक व समन्वय” चा वार्षिक दिन शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या कुडीलाल हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे महासंसदरत्न, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव श्री सुबोध तिवारी, योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बंदिता सतपते, डॉ रणजीत सिंग भोगल, डॉ. संतोष पांडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, वि‌द्यार्थी, लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री निखील आकरे यांनी श्री श्रीरंग अप्पा बारणे यांचा संक्षिप्त स्वरूपात परिचय करून दिला. श्री सुबोध तिवारी यांनी प्रमुख पाहुणे श्री श्रीरंग अप्पा बारणे यांचा शाल, कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा, स्वामी कुवलयानंद यांची मूर्ती देऊन सन्मान केला. योग महविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बंदिता सतपते यांनी योग महावि‌द्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर प्रमुख पाहुणे श्री श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभहस्ते योग महावि‌द्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता, उत्कृष्ट कामगिरी आणि वर्गातील सर्वाधिक उपस्थितीबद्दल १ . “प्रियदर्शनी शिष्यवृत्ती २ .श्री रामेश्वर प्रसाद निवाटीया शिष्यवृत्ती” आणि ३. “श्रीमती भगवती देवी बाबुराम तिवारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कैवल्यधाम संस्थेवर रचलेले व्हिडीओ गीत आणि संस्थेच्या शताब्दी वर्षाची चित्रफित दाखविण्यात आली.योग महावि‌द्यालयातील वि‌द्यार्थ्यांनी “श्री गणेश वंदना” सादर केली तसेच शिव-पार्वती, ऋषी मुर्नीपासून ते कैवल्यधाम संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंदजी यांच्यावर आधारित योगाचा इतिहास ” योग रहस्य” नाट्य व नृत्य यामधून सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.प्रमुख पाहुणे महासंसदरत्न, मावळ लोकसभा खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे यांनी उपस्थितांना आपल्या भाषण शैलीतून संबोधित केले. कैवल्यधाम योग संस्थेच्या अखंड १०० वर्ष सुरु असलेल्या कार्याविषयी आपण लोकसभेत विषय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सभासदांसाठी “योग कार्यशाळा” आयोजित करण्याविषयी मी लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला जी यांस प्रस्ताव देईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आणि संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन योग शिक्षिका ममता बिष्ट यांनी केलेकार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कैवल्यधाम संस्थेच्या सौ. अश्विनी मुडलगीकर, श्री बर्नार्ड ब्रिट्टो, श्री किरण लांडगे, श्री बंडू कुटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page