अजित फाउंडेशन संस्थेच्या वतीने ‘प्रॉमिस ऑफ पेन्सिल’ उपक्रमांतर्गत तळेगाव येथे ५५ गरजू विद्यार्थांना स्कुल किटचे वाटप


मावळ मराठा न्यूज़ तळेगाव , अजित फाउंडेशन संस्थेच्यावतीने ‘प्रॉमिस ऑफ पेन्सिल’ उपक्रमांतर्गत तळेगाव शहरातील गणेश विद्यामंदिर प्राथमिक शाळा क्र.७ मधील ५५ गरजू विद्यार्थांना स्कुल किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री एन.के.पाटील सर, जागरूक वाचक कट्टा व सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी श्री. गणेश बोरुडे जी, लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष डॉ.अनिकेत काळोखे जी, झोन चेअरमन मा.प्रमिलाताई वाळुंज जी, वैशाली मिरगे मॅडम, धीरज भालेराव सर, शाळा व्यवस्थापन समितीचे श्री.गुलाब शेलार जी उपस्थित होते.




