अभुतपूर्व मैत्रीची व्याख्या सांगत परमपूज्य सुविधीजी महाराज साब नी उलगडले अनोखे मैत्रीचे पुष्प









मावळ मराठा न्युज – लोणावळा,आयुष्यामध्ये पाच प्रकारचे मित्र येतात यामध्ये थाली, प्याली,ताली,खाली,माली अशी व्याख्या सांगत वेगवेगळ्या प्रकारचे मित्र आपल्या आयुष्यात येत असतात आपण आपले आयुष्य कोणत्या मित्र बरोबर घालायचे हे आपण ठरवायचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी माली मित्र सारखे मित्र निवडायचे असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मित्र से चारित्र आणि चारित्र्य से मित्र यावरही त्यांनी उत्कृष्ट व्याख्यान दिले. अशा अभूतपूर्व धार्मिक वातावरणात आजचा मैत्री दिवस संपन्न झाला. याप्रसंगी जैन मंडळातल्या सुनांनी आणि मुलांनी निसर्गाशी कशी मैत्री जपावी याबद्दल एक सुंदर नाटिका सादर केली. तसेच आज चिरंजीव मनोज श्रीक्षीमाळ यांच्या नऊ उपवासाची पचकावणी करण्यात आली. श्री वर्धमान जैन स्थानक वासी श्रावक संघाचे अध्यक्ष श्री गिरीशजी पारख यांनी तपस्वी चा संघातर्फे सत्कार केला. परमपूज्य महाराज साब त्यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. मंगल पाठ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर गौतम प्रसादीची व्यवस्था श्रीमती कांताबाई चंपालालजी नहार यांच्यातर्फे करण्यात आली. याची संपूर्ण माहिती संघाच्या प्रतिनिधी जनसंपर्क अधिकारी सौ मनीषा बंबोरी यांनी दिली.



