श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने २४ रथाद्वारे २४ तीर्थंकरांची निघणार रथयात्रा


मावळ मराठा न्यूज :-पिंपरी(प्रतिनिधी) चिंचवड(सुदर्शन नगर) येथील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने १००८ श्री महावीर भगवान जन्मकल्याण महोत्सव अंतर्गत आदिनाथ भगवान ते महावीर भगवान अशा २४ रथाद्वारे २४ तिर्थकरांची प्रभावना फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नेमीचंद ठोले, कार्याध्यक्ष शीतल पहाडे, श्री सतीश दोशी, श्री शीतल शाह यांनी दिलीदि.३ एप्रिल रोजी स.७.३० ते ९.३० या वेळेत हि रथयात्रा चिंचवड परिसरातून काढण्यात येईल.रथयात्रेची सुरुवात सुदर्शन नगर येथील १००८ श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरापासून होईल. फरांदे डेंटल हॉस्पिटल- प्रा मोरे नाट्यगृह- चाफेकर चौक- बस स्थानक- केशव नगर- कल्याण प्रतिष्ठान- काकडे पार्क- शिवाजी उदय मंडळ- लिंक रोड- गावडे पेट्रोल पंप- सुदर्शन नगर मार्गे मंदिरात सांगता होईल. या रथयात्रा फेरीत सुमारे चारशे भाविक सहभागी होणार आहेतया व्यतिरिक्त मंदिरात स ९ ते ११ अभिषेक, शांतीधारा,सामूहिक पूजन,११:३० वा भगवान महावीरांचा पाळणा, वात्सल्य भोज,१० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, संध्याकाळी महाआरती असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.




