लोणावळ्यात सत्यानंद तीर्थ धाम येथे तीन दिवसीय साधना सत्संग भक्तिमय वातावरणात संपन्न


मावळ मराठा न्युज:- लोणावळा, शहरातील सत्यानंद तीर्थ धाम लोणावळा येथे सद्गुरू ईश्वरदास अमृतवाणी सत्संग ट्रस्ट आयोजित तीन दिवसीय साधना सत्संग शिबिर गुरुजी विजेंद्र यांच्या दिव्य उपस्थितीत संपन्न झाले. या वेळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सदगुरु ईश्वरदास महाराज व सदगुरु सत्यानंद महाराज यांच्या समाधी स्थळाला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.राम जप महिमा व साधकाच्या जीवनातील गुरूचे स्थान याविषयी विवेचन करण्यात आले. सद्गुरू सत्यानंद महाराज लिखित महाराज अमृतवाणी ग्रंथाचे पारायण करण्यात आले. भक्ती प्रकाश ग्रंथांतील गुरु महिमा निरूपण करण्यात आला. याप्रसंगी मुकुल अग्रवाल, विनोद देवडा, विजय चौधरी, यश चौधरी, चंदा गर्ग, विमल सराफ, जसवंत पुरोहित, शेरा पुरोहित, प्रमोद बंसल, सरोज बन्सल, अनिता पाटील,सुरेश गुप्ता, किरीट जोशी, किरीट भट यांच्यासह हजारो भाविकांनी साधना सत्संग शिबिरात सहभाग नोंदवला साधना शिबिर काळात मोबाइल बंदी असल्यामुळे सर्व भाविकांना एकांत साधून साधना शिबिराचा आनंद घेता आला.



