शाश्वत विकास,हाच माझा विश्वास,आणि मतदारांवरील विश्वासाच्या जोरावरच पुन्हा निवडणुक जिंकणार – भाऊसाहेब गुंड

मावळ मराठा न्युज -कुसगाव,कुसगाव-काले गटाचे उमेदवार दत्तात्रयभाऊ गुंड यांच्या दिनदर्शिकचे महिलांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच करण्यात आले. कुणाला कितीही टीका करू द्या; मतदार राजा हा सर्व श्रेष्ठ असतो आणि त्याचा विश्वासावरच मी निवडणुकीला सामोरे जातोय. गुंड आडनावावर टीका करणारे आमदार सुनील शेळके यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही माझे मतदार बंधू आणि भगिनीच उत्तर देतील याची मला खात्री आहे. मी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर, मागील अनेक वर्षांची जनसेवेची परंपरा जपत यावेळी देखील या वर्षी दिनदर्शिकेचा उपक्रम राबविण्यात आला. कुसगाव आणि काले भागाचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, हाच अजेंडा घेऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कुसगाव काले गटाचे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी केले. कुसगाव पाणी प्रश्न मी माझ्या त्यावेळी उपसरपंच असतानाच्या काळातच तत्कालीन आमदार स्वर्गीय दिगंबर दादा भेगडे यांच्या सहकार्यामुळे मार्गी लावता आला. त्यामुळे कुसगांव येथील सर्व ग्रामस्थांना सर्वात मोठा भेडसावणारा पाणी प्रश्न मी सॊडवू शकलो याचे समाधान असल्याचे भाऊ गुंड यांनी साप्ताहिक मावळ नागरिकशी बोलताना सांगितले.

कुसगाव-काले गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भाऊ गुंड यांच्या नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन परिसरातील माता-भगिनींच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दत्तात्रय गुंड हे भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष असून,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. देशात आणि राज्यात सत्ता नसताना जो नागरिकांच्या समस्या सोडवू शकतो. आता तर देशात नरेंद्रजी मोदी आणि राज्यात देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे सरकार आहे त्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही. असा विश्वास गुंड यांनी व्यक्त केला. पर्यटनाला पोषक वातावरण आपल्या परिसरात असल्याने पर्यटन आणि रोजगारावर भर देणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले. मतदारांनी दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोने करून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देईल, तसेच गावांमधील मूलभूत समस्या सोडवून शाश्वत विकास साधला जाईल, हाच माझा निवडणुकीतील प्रमुख ध्येय असल्याचे गुंड यांनी यावेळी स्पष्ट केले.

मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

गेली २० वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना गुंड यांनी केलेल्या कामांची दखल घेत, मतदारांनीच त्यांना उमेदवारी मिळावी अशी एकमुखी मागणी लावून धरली होती. कुसगाव व काले भागाच्या विकासासाठी दत्ताभाऊ गुंड हैच सक्षम नेतृत्व असल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली असून, विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कुसगाव आणि पवनानगर परिसरातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी मतदारांना बांधील आहे. असे दत्तात्रय (भाऊसाहेब) गुंड यांनी स्पष्ट केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page