लोणावळ्याचे जेष्ठ विधिज्ञ् अशफाक काझी यांना पुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अण्ड गोवा यांच्या वतीने ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड २०२५

मावळ मराठा न्युज-लोणावळा,पुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अण्ड गोवा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड . अशफाक काझी (एस. ए. काझी) यांना ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यात पार पडलेल्या भव्य समारंभात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.ऍड. अशफाक काझी हे मूळचे लोणावळ्याचे रहिवासी असून, गेली ४७ वर्षे पुणे व वडगाव मावळ परिसरात कायदा क्षेत्रात कार्यरत आहेत. सिव्हिल लिटिगेशन, मालमत्ता वाद, बंदी आदेश, जाहीर घोषणा व वसुलीचे दावे यामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.त्यांनी पुण्यातील नामांकित आय. एल. एस. लॉ कॉलेजमधून शिक्षण घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध नोकऱ्या करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीची सुरुवात सुप्रसिद्ध एस. के. वैद्य चेंबर्समध्ये अॅड. एस. ए. रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली केली.सिव्हिल प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यातील त्यांचा सखोल अभ्यास, तसेच न्यायालयीन मांडणीतील स्पष्टता यामुळे त्यांनी वकिलीच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. त्यांनी अनेक नवोदित वकिलांना मार्गदर्शन आणि आर्थिक केली असून, आजही ते ही मदत अविरतपणे सुरू आहे.ऍड. अशफाक काझी यांना मावळ मराठा न्युज परिवार कडून खूप खूप शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page