श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ,अंबरवाडी येथील गणपती बाप्पाला अंघोळीचे व भाविकांचे पिण्याचे पाणी बंद करणाऱ्याला पाठिंबा देणाऱ्या लोणावळा नगरपरिषद,लोणावळा शहर पोलीस प्रशासन नक्की करतंय काय?

मावळ मराठा न्युज – लोणावळा,श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ अंबरवाडी देवस्थानला अशोक कन्स्ट्रक्शन तर्फे अजय नंदलाल दोषी यांनी १९९४ ला सदर ट्रस्ट करण्यासाठी ना हरकत पत्र दिले आणि त्यानी त्या पत्रात असेही नमूद केले की त्यांच्या मालकीच्या जागेतील १७५० स्क्वेअर फूट जागा आणि शेजारील मोकळी जागा मंदिरसाठी दिलेली आहे . सदर जागा १९९४ च्या आधी पासून १५ वर्षे सदर जागेचा कब्जा आणि ताबा देखील मंदिराचा आहे. १९९४ ला जागा मालकानी पत्र दिल्यानंतर १९९७ साली ट्रस्ट स्थापन करण्यात आली. लगेच ७ नोव्हेंबर १९९८ ला तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि लोणावळ्याच्या तत्कालीन नगराध्यक्षा रेखा जोशी यांनी सदर श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ,अंबरवाडी मंदिराचे भूमिपूजन केले. त्याचा कोनशीला मंदिर परिसरात लावलेला असताना तब्बल ३२ वर्षानंतर लोणावळ्यातील काही जण आपल्या पदाचा आणि प्रतिष्ठाचा गैरवापर करून आणि लोणावळा नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांचेवर दबाव टाकून आम्हा विश्वस्त मंडळाला हुसकावण्या साठी नाहक त्रास देत असल्याचा आरोप विश्वस्त मंडळाने मावळ मराठा न्युज शी बोलतांना केला आहे. यातील घटनाक्रम आणि कायदेशीर बाजू लक्षात घेऊया –







१) ट्रस्ट ला १९९४ ला ट्रस्ट करण्यासाठी नाहरकत पत्र दिले. अशोक दोषी यांचे निधन २००१ ला झाले. अजय दोषी यांचे निधन २००५ ला झाले. अशोक कंस्ट्रक्शन तर्फे पूर्वी केलेल्या मोजणीत मंदिर आहे. २०२१ ला मोजणी करण्यात आली. तरीही २०२१ ला मयत व्यक्तीतर्फे अशोक दोषी तर्फे केलेली ही मोजणी कोणी आणि कोणत्या अधिकारात केली? तसेच सदर मोजणीत भूमी अभिलेख अधिकारी यांनी मंदिरच गायब केले आहे. त्याच परिसरातील विहीर दिसते पण मंदिर गायब. त्याचवेळी लोणावळा नगरपरिषद डीपी प्लॅन मध्ये मंदिर दिसतेय.
२) दबाव टाकणारे स्वयंघोषित विश्वस्त म्हणतात ट्रस्ट ची जागा ही खाजगी प्रॉपर्टी आहे. तुम्ही येथील साफसफाई करू नका आणि मग लोणावळा नगरपरिषद या खाजगी प्रॉपर्टी मध्ये सफाई कामगार पाठवते आहे मग लोणावळा नगरपरिषद अशीच सर्व खाजगी मालमत्तेची घरोघरी जाऊन सफाई कामगार पाठवून सफाई करणार आहे का? असा सवाल ट्रस्टिनी केला.

३) आम्ही मंदिर सुरक्षेसाठी लावलेली सी सी टीव्ही यंत्रणाचा सर्व खर्च देवस्थान करते आणि राउत नावाचा इसम ज्याला काहीच अधिकार नाही तो अजिंक्य सुंज उर्फ अजय राव उर्फ़ ललित राऊत आणि त्याची बायको मयुरी राऊत, आई वेणूबाई राऊत व संतोष सावळे व विजय शिलावणे इकडे कधीही येऊन धुमाकूळ घालतात, गाडीचे काच फोडतात ,मारहाण, धमक्या देतात, विहिरीची मोटार फेकतात ,संस्थेचे गोडाऊन दुरुस्त करू देत नाहीत,भक्तांसाठी शौचालय करू देत नाहीत, विहिरीचे पाणी मात्र ८-९ वर्षे दोषीच्या बंगल्यात ललित राऊतने वापरले त्याचे बिल मात्र देवस्थाननें भरले आहे. आता कोणाच्या सांगण्यावरून विहिरीचे पाणी तेही वापरू देत नाही, विहीरला कुलूप लावले आहे त्यामुळे देवालयातील गणपती बाप्पाची अंघोळ, पूजा कशी करायची? असा प्रश्न आता पडला आहे. देवस्थानाच्या मालमत्तेची नासधूस करतो,अजिंक्य राऊत नावाच्या केअर टेकरची दादागिरी एवढी वाढली की परस्पर लोकवर्गणी गोळा करतो आणि हिशोब मागितला तर ती पावती पुस्तके जाळून टाकतो. पोलिसांना आम्ही खिशात घालतो असे म्हणणाऱ्या राऊत वर पोलीस कोणतीच कारवाई करत नाही उलट आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात पोलीस उभं करत आहेत. पोलीस निरीक्षक कोणताही अधिकार नसताना एवढा धुमाकूळ घालणाऱ्या अजिंक्य राऊत यावर कोणतीच आणि काहीच कारवाई करत नाही. तक्रार द्यायला गेलेल्या ऍड सचिन परळकर यांना गळा कसा दाबला जातो ? याचे प्रात्यक्षिक जर पोलीस निरीक्षक एका वकिलाला करुन दाखवतो ज्याने कायद्याचे ज्ञान घेतले आहे तर बाकी सामान्य नागरिकांशी या महाशयांचे वर्तन कसे असणार? यावर न बोललेलेच बरं. लोणावळा शहर पोलिसांच्या कृतीवर ट्रस्टिनी नाराजी व्यक्त करत कोणाचा जीव गेल्यावर कारवाई करणार आहात का? असा सवाल केला आहे .
४) रात्रीच्या वेळी स्वयंघोषित ट्रस्टी आपले विश्वस्त मंडळ म्हणून बोर्ड लावून जाते,त्यात ना संस्था रजि.नंबर,ना विश्वतांची पदे,बोर्ड लावले म्हणून कोणी ट्रस्टी होत नाही. सदरच्या स्वयं घोषित विश्वस्तांना जागा मालकाने दिलेली ऍथॉरिटी यांनी दाखवावी असा सवाल ट्रस्टी यांनी केला.
५) जमीन ज्यांची आहे त्यांचे कुटुंबातील आम्ही दोन ट्रस्टी करायला तयार असताना बाहेरचे यात विनाकारण काही संबंध नसताना तसेच धर्मादाय आयुक्त यांचेकडे दिलेले वकीलपत्र काढून घेण्यासाठी ललित राऊत व मयुरी राऊत यानी ऍड.विदुला वर्तक व ऍड सचिन परळकर यांना मारहाण केली. असे ऍड विदुला वर्तक यांनी सांगितले.
६) सत्तेचा गैरवापर कसा असा प्रश्न विचारल्यावर ट्रस्टिनी असाच प्रकार २०१७ साली लोणावळा नगरपरिषदेत सत्तेत असणारे यातील एक जण आता पुन्हा या एक दीड वर्षांपासून सत्तेत आलेल्यासोबत आल्याने सत्तेत आल्यावरच असा गैरवापर करता येतो म्हणून आम्ही असे म्हटल्याचे ट्रस्टी यांनी सांगितले.
७) आणि शेवट चा मुद्धा मांडत संकष्टी चतुर्थीला असणारा भंडारा चे कोणताही अधिकार नसताना परस्पर ट्रस्टीना न कळवता ट्रस्टी यांचे बुकिंग झालेल्या दानशूर भक्ताला डावलून अचानक ते रद्द करून त्याचा ओळखीचा आणि जवळच्या व्यक्तीला भंडाराचा मान मंदिर परिसरात दमदाटी आणि गोंधळ घालून दिला जातॊ अशी मनमानी आणि चुकीचा कारभार चालू असताना पोलीस, नगरपरिषद आणि धर्मादाय आयुक्त यांचेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप अंबरवाडी येथील श्री सिद्धिविनायक सेवा मंडळचे आजी व माजी विश्वस्त अध्यक्ष नंदकुमार वर्तक,खजिनदार बापू संतोष पाटील, सचिव सुनील काशिनाथ भोंडवे, राजेंद्र एकनाथ पाटील, सुधीर सुदाम कुटे, विपीन वसंत देशमुख,अनंत कुशाबा देशमुख एकनाथ त्र्यंबक पाटील,कर्मचारी दिलीप पांडा आणि पुजारी चंद्रशेखर भालेराव यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना केला.



