ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद पांडुरंग बेंद्रे यांचे वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

लोणावळा दि. २९ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद पांडुरंग बेंद्रे वय ९१ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बेंद्रे काका या नावाने ते परिचित होते.ते कुशल बांधकाम व्यावसायिक होते. तसेच त्याचा फर्निचर चाही पूर्वी व्यवसाय होता. बँक ऑफ महाराष्ट्र च्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांतील फर्निचरचे काम यांचेकडे असे.भांगरावाडी येथील श्री राम मंदिर आणि लक्ष्मी नारायण मंदिराची त्यांनी अविरत सेवा केली. ॲड स्व. बापूसाहेब भोंडे यांचेसह सरस्वती विद्या निकेतन (ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल) उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.स्व. भरत अगरवाल आणि बेंद्रे काका यांनी एकत्र येत त्याकाळी पतसंस्था सुरू केली.लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सभापती पदही त्यांनी भूषविले. श्रीराम मंदिर निर्माण कारसेवेसाठी ते गेले होते. अतिशय स्पष्टवक्ता, दिलदार व्यक्तिमत्व आज काळाच्या आड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे,पंतवंडे असा परिवार आहे. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page