निगडी येथील उद्यानातील भक्ती शक्ती समूह शिल्प त्वरित आणि नियमित स्वच्छ ठेवा – युवराज दाखले


मावळ मराठा न्युज:- निगडी, भक्ती शक्ती निगडी येथील उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या स्मारकाची स्वच्छता दररोज करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ तथा समन्वयक सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ प्रभाग अधिकारी सुचिता पानसरे यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रात असलेल्या भक्ती शक्ती उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या समुहशिल्पाची पक्षी बसतअसल्याने अस्वच्छता झालेली आहे. उद्यान देखभालीसाठी व सुरक्षेसाठी लाखो रूपये ठेकेदार यांना देत असतो . परंतु त्यांच्याकडून जबाबदारीने काम केले जात नाही हे स्पष्ट दिसत आहे.तरी तात्काळ त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन रोजच्या रोज स्मारक स्वच्छ करण्याच्या तात्काळ सुचना द्याव्यात असे हि दाखले यांनी पत्रात नमूद केले आहे.




