लोहगड किल्ल्याच्या जागतिक वारसा नोंदीसाठी संपर्क संस्थेचा खारीचा वाटा -अमित कुमार बॅनर्जी

तालुक्यातील लोहगड किल्ल्याची जागतिक युनेसको वारसा नोंद व्हावी यासाठी संपर्क संस्थेने २०१६ पासून हेरिटेज वॉक नावाने एक चळवळ सुरू केली होती आणि खऱ्या अर्थाने आज त्या चळवळीला यश आल आहे या चळवळीमध्ये लोहगड,विसापूर किल्ले संवर्धन विकास मंच चे कार्यकर्ते तसेच भाजे ग्रामस्थ लोहगड ग्रामस्थ या सर्वांचं सहकार्य लाभलं होतं.२०१६ पासून या हेरिटेज वॉल्क मध्ये इतिहास प्रेमिनी हजारो संख्येने सहभाग घेऊन हेरिटेज वॉक मध्ये अनेकांनी या लोहगड किल्ल्याची युनेस्को यादीमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न केले. संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी यांनीही युनेस्को यादीत लोहगड किल्ल्याची नोंद व्हावी यासाठी सरकारी पातळीवर सुद्धा पाठपुरावा केला आणि सतत पाच वर्ष हेरिटज वाक ही पदयात्रा सुरू करून या पदयात्रेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला होता असे या भव्य दिव्य हेरिटेज वाक या पदयात्रेमध्ये जगभरातून लोक या ठिकाणी उपस्थित झाली होती.आपले एकंदरीत योगदानाबद्दल बोलताना अमित कुमार बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page