कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राष्ट्र गौरव पुरस्कार-साहित्य क्षेत्र, लोणावळ्याच्या लेखिका व कवियत्री सिंधू विठ्ठल जाधव यांना प्रदान

मावळ मराठा न्युज – वरुड(जि.अमरावती) येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राष्ट्र गौरव पुरस्कार-साहित्य क्षेत्र लेखिका व कवियत्री सिंधू विठ्ठल जाधव,लोणावळा यांना रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी आळंदी येथे द कल्चर हॉटेलमध्ये भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.आतापर्यंत साहित्य क्षेत्रात सिंधू विठ्ठल जाधव यांना त्यांच्या काव्य लेखनामध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून हा सन्मान हा कवितांचा गौरव करणारा आहे त्यासाठीच त्यांची राष्ट्र गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे,लेखिका,सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलकाताई नाईक,भूमाता ब्रिगेडरच्या प्रमुख तृप्ती देसाई,अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष श्री.संजय कुलकर्णी यांचे हस्ते सर्व पुरस्कार प्राप्त असणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला. मावळ मराठा न्युज परिवाराच्या वतीने कवियत्री सिंधू जाधव यांचे हार्दीक अभिनंदन..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page