लोणावळा महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक एन एस एस दिनाचे औचीत्य साधुन रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि डॉ बी एन पुरंदरे आर्टस्, सायन्स,कॉमर्स वलवण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षरोपण करण्यात आले. सुरवातीस डॉ पवन शिनगारे कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ N.S.S.से महत्व आणि महाविद्यालय यांचा सहभाग विषद केला. तसेच पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख करून दिली.कॉलेजचे प्राचार्य डॉ देशमुखयांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. एक पेड के नाम या योजनेची माहिती दिली प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या मातेच्या स्मरणार्थ एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जवाबदारी घ्यावी असे सांगितले.रोटरीचे अध्यक्ष रो. नारायण शेवाळे,माजी अध्यक्ष रो.रविंद्र कुळकर्णी यांनी वृक्षावरोपणाची गरज व रोटरीच्या कार्याची ओळख करून दिली. महाविद्यालयाचे उपाध्यक्ष, दत्तात्रय पाळेकर यांनी एन एस एस चे कार्य व त्याची प्रगती, तसेच विद्यापिठाकडून मिळालेले विविध पुरस्काराबद्दल माहिती दिली. संस्थेकडून पुढेही एनएसएस ला सर्वोतपरी मदत करेल असे आश्वासन दिले.रोटरी क्लब ऑफ लोणावळा यापुढे देखील मोठे प्रकल्प महाविद्यालय सोबत राबविण्यात येतील अशी ग्वाही दिली.प्रतिनिधिक स्वरूपात लोणावळा महाविद्यालय च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यार्थी प्राध्यापक रोटरीयन उपस्थित होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण वर्तक,नितीन कल्याण,जयवंत नलोडे,कौस्तुभ दामले आवर्जून उपस्थित होते.संस्थेचे खजिनदार दत्तात्रय येवले,उप प्राचार्य डॉ विलास पाटील,प्रा धनराज पाटील,कार्यक्रम अधिकारी प्रा.गोंदके उपस्थित होते.प्रथम सत्रानंतर दुसऱ्या सत्राचे वृक्षरोपण वरसोली गावाजवळील टेकडीवर करण्यात आले.१०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी करंज,चिंच,पिंपळ या जातीच्या वृक्षाची लागवड केली.वृक्षारोपण नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page