सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई,अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त १६ जणांवर गुन्हा


मावळ मराठा न्युज :-लोणावळा, उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगांव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी आज दिनांक २९/१२/२०२३ रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता मौजे वेहेरगाव येथे मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट व मटका लावणारे १० इसम हे ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम व इतर असा एकूण २ ,५० ,४८५ रू.(अक्षरी दोन लाख पन्नास हजार चारशे पंच्यानशी) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या इसमांकडे केलेल्या प्राथमिक तपासात इसम नामे १) चंद्रकांत देवकर, २) शंकर बोरकर, ३) निलेश बोरकर, ४) संतोष बोत्रे हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद १६ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो हवा सचिन गायकवाड, पो हवा अंकुश नायकुडे, पोना रईस मुलानी, पो शी सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांचे पथकाने केली आहे




