लोणावळ्यात मावळ एकता कलामंच आयोजित भव्य नृत्यस्पर्धा संपन्न


मावळ मराठा न्यूज,लोणावळा,लोणावळ्यात ॲड बापुसाहेब भोंडे हायस्कूल येथे नुकताच मावळ एकता कला मंच आयोजित भव्य नृत्य स्पर्धा २०२२ संपन्न झाली. साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्य संपादक ॲड संजय पाटील आणि एम पी एन न्यूजचे सागर शिंदे यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सोनी मराठीचे महाराष्ट्राज बेस्ट डान्सर दिपक हुलसुरे यांनी पाहिले.यास्पर्धेला मावळ बरोबरच पुणे लातूर,मुंबई,कल्याण,पेन आणि नेपाळ हून सुद्धा स्पर्धक आले होते. लहान गट वयक्तिक नृत्य स्पर्धेत पहिले बक्षीस : ईशिता बरवड ,दुसरे बक्षीस : पुनीत परमार तिसरे बक्षीस : सावी अंबुरेतर मोठा गट वयक्तिक पहिले बक्षीस : समर्पण लामा ,नेपाळ दुसरे बक्षीस : तीक्षा गायकवाड,घनश्याम सोनवले विभागून तिसरे बक्षीस : नेहा पाटिल,तर ग्रुप नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक GND क्रेव द्वितीय नादब्रम्ह नृत्यालय आणि S G क्रिव विभागून तर तृतीय MDA क्रेव या ग्रुप ला मिळाले.नटराज पूजन करून लोणावळा नगरपरिषदेकडून स्वच्छ्ता बाबत शपथ घेण्यात आली,यावेळी सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष,प्रमोद गायकवाड,श्रीधर पुजारी,भरत हरपुडे,विजय उर्फ पोपट मोरे,अंजना कडू,जेष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तीखे,मृदुला पाटील, रोटरियन उदय पाटील,गोरख चौधरी बापू पाटील,उमा मेहता,राजेश मेहता,डिजिटल मीडिया अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर भिमराव तुरुकमारे,श्रावणी कामत,संयोजक संजय पाटील,सागर शिंदे,सूरज आणि साई आणि दिपक हलसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमातील विजेत्यांना रोख ३७ हजाराचे बक्षीस देण्यात आले. सदर बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बारणे आणि गायत्री रिले यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमातील स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ॲड संजय पाटील यांनी प्रास्तविक केले त्यात त्यांनी लोणावळ्यात सर्व सोयीनी युक्त सांस्कृतिक भवन असावे अशी उपस्थित मान्यवरांकडे मागणी केली आणि त्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले तर सागर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.परीक्षक म्हणून दिपक हलसुरे आणि सूरज जाधव यांनी उत्तम परीक्षण करून परफॉर्मन्स सुध्धा देवून नृत्य प्रेमिंची मने जिंकली.रोशनी ठाकूर, आशा वर्मा आणि सिद्धार्थ लांडगे यांनी परिश्रम घेतले.




