३० वर्षातील मावळच्या लोकप्रतिनिधीनी पुणे मुंबई दृतगती महामार्गच्या बाधित शेतकरी यांच्याकडे दुर्लक्ष,पुणे मुंबई दृतगती महामार्ग कृती समिती यांचे१० सप्टेंबरला आयआरबी विरोधात आंदोलन

मावळ मराठा न्यूज- पुणे मुंबई दृतगती महामार्ग शेतकरी कृती समिती गेली तीस वर्षे मावळातील लोकप्रतिनिधी च्या नाकर्ते पणा विरोधात ऍक्शन मोडवर,१० सप्टेंबर २०२६ ला आय आर बी विरोधात मागण्याचे निवेदन देऊन निषेध करणार आहेत. पुणे मुंबई दृतगती महामार्ग शेतकरी कृती समिती च्या मते तीस वर्षापुर्वी पुणे मुंबई दृतगती महामार्गाची निर्मिती झाली. या महामार्गा मध्ये सुमारे १५ गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादन केल्यामुळे शेतकरी बाधीत झाले. शासनाने शेतकऱ्यांना कवडी मोलाने शेतीचा मोबदला दिला. संपादित जमीनीचा मोबदला अत्यल्प असल्यामुळे तो पुर्णपणे भूमीहिन झाला. मावळातील या काळातील लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या नाकर्तेपणा मुळे तो देशोधडीला लागला. शेतकऱ्यांची कुटुंबाची पुर्णपणे वातहत झाली. परंतु याच महामार्गाला सरकारने IRB कंपनीला भाडे तत्वावर दिलेला आहे. दररोज कोटी रुपये उत्पन्न कमवून कंपनी बाधित शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी किंवा गावासाठी कोणताही सी एस आर निधी उपलब्ध करून देत नाही. गेल्या दीड दोन वर्षांपासून मावळाचे तहसीलदार, बाधीत शेतकऱी आणि आय आर बी यांच्यात बैठक झाली परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही त्यामुळे आता शेतकरीकृती समिती ऍक्शन मोडवर आली आहे. त्यात आज लोणावळा नगरपरिषद येथील पत्रकार कक्ष येथे झालेल्या पत्रकार परिषद मध्ये आपल्या मागण्या आणि आंदोलन याबाबत पत्रकारांना माहिती दिली.शेतकरी कृती समिती च्या मागण्या – १) संपादित शेतकऱ्यांच्या मुलांना आय.आर.बी कंपनीत नोकऱ्या मिळाव्यात. या नोकऱ्यामध्ये टोलनाके वर ड्रॉव्हर, गार्डन, सेक्युरिटी गार्ड, मेंटेनन्स व संबधीत असणाऱ्या खात्यामध्ये नोकरी देण्यात यावी.२) सर्व संपादित शेतकऱ्यांना टोल फ्री मुबंई-पुणे टोल फ्री पास मिळावा.३) एक्सप्रेस हायवे,सुपर हायवे निर्माण करताना ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे दोन भाग झाले, त्या शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी व त्या गावांआपणाकडेना जाण्यायेण्यासाठी सव्हिस रोडचे काम करण्यात यावे.४ ) गेली तीस वर्ष आय आर बी कंपनीने टोलच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमविला, म्हणून त्यांनी संपादित गावांना ग्रामपंचायत विकासासाठी सी.एस आर.फंड खर्च करावा.५) सुपर हायवेच्या रस्त्याखाली जे ओढे,नाले गेले आहेत. त्या ओढया नाल्यावरील मोऱ्या रुंद व खोल करण्यात याव्यात की जेणेकरुन शेतकऱ्याना शेती कामासाठी अलिकडे व पलिकडे ट्रॅक्टर व इतर औजारे नेण्यासाठी तयार करण्यात यावा.६) टोल नाक्याजवळून संबंधीत गावाना शेतीसाठी व शेतातील माल वाहतुक करण्यासाठी जि वाहने टोल नाक्यावरुन नेली जात असता त्यांना दंड आकारु नये.या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी समितीने विनंती पत्रकार परिषदेत केली आहे. संघटनेला व शासनाला कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे दि १०/०९/२०२६ रोजी मोर्चाद्वारे निवेदन देण्यात येत आहे. यानंतर ही आय आर बी ने मागण्या मान्य केल्या नाहीत मोठेआंदोलन उभारू असा इशारा माजी जि.प.सदस्य,भाई भरत मोरे,मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे साईनाथ मांडेकर,संतोष गिरी,सोनु खाडे, गणपत केदारी,मा सरपंच व कृती समिती अध्यक्ष गुलाब शंकर तिकोणे,संतोष दळवी,बबनराव आबेंकर, बाळासाहेब पिंपळे,रोहिदास पारखी,विजय तिकोणे,जयसिंग ठाकुर,बाजिराव लगड,चंद्रकांत गाडे आदी समितीचे पादाधिकारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page