*लोणावळा महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन व अर्ज भरण्यासाठी विशेष मोहिम सप्ताह*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,समाजातील वंचित,आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तळागाळातील तसेच गुणवंत व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने केंद्र शासन, राज्य शासन तसेच विविध सामाजिक संस्थांमार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाविद्यालयातील जास्तीत जास्त पात्र व गुणवंत विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तींचा लाभ मिळावा, यासाठी महाविद्यालयाची शिष्यवृत्ती समिती माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कार्यरत असते.याच अनुषंगाने लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन व अर्ज भरण्यासाठी विशेष मोहिम सप्ताह दिनांक ०१ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. *या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले* .समता सेंटर ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन यांच्यामार्फत शिष्यवृत्ती अर्ज कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे कोणती तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व प्रत्यक्ष फॉर्म भरून देण्यात आले. तसेच समाज कल्याण विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती मिस पौर्णिमा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक गणेश आखाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या मार्गदर्शन कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विशेष मोहिमेअंतर्गत आज महाविद्यालयात *प्रत्यक्ष शिष्यवृत्ती मार्गदर्शन व अर्ज भरण्याची अ‍ॅक्टिव्हिटी घेण्यात आली* असून आजच्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज यशस्वीरीत्या भरून घेण्यात आले.हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. शिष्यवृत्ती समन्वयक व नोडल अधिकारी डॉ. मल्हारी नागटिळक यांच्या प्रभावी नियोजनामुळे उपक्रम यशस्वी ठरला. तसेच शिष्यवृत्ती समितीचे सदस्य, विद्यार्थी विकास अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी सक्रिय सहकार्य केले.या विशेष मोहिमेमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असून उर्वरित कालावधीतही अशाच प्रकारचे मार्गदर्शन सुरू राहणार असल्याचे शिष्यवृत्ती विभागामार्फत सांगण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page