लोणावळ्यात दररोज शंभर लोकांना महावीर की रोटीचे वाटप




मावळ मराठा न्युज -लोणावळा,जैन नारीशक्ती आयोजित महावीर की रोटी रोज सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शंभर लोकांना दोन चपाती आणि जैन भाजीचे मोफत वाटप केले जाते. याची सुरुवात महावीर जन्मकल्याणक रोजी करण्यात आली. कोणाचा वाढदिवस असो, कोणाचा लग्नाच्या वाढदिवस, किंवा कोणाच्या स्मृती पित्यर्थ पण खरे सांगायचे तर दान देण्यासाठी काहीही दिवस लागत नाही. रोज शंभर लोकांना या ठिकाणी अगदी आनंदाने हे वाटप केले जाते. अन्नदान सारखे पुण्य नाही आणि याचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी सामील व्हावे असे आवाहन मनीषा बंभोरी यांनी केले आहे.भुकेल्याचा पोटात दोन घास गेल्यापेक्षा दुसरे समाधान नाही.




