लोणावळ्यात गणेश मंडळाची लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि शांतता कमिटीची बैठक संपन्न ; पोलिसांच्या मिरवणूक नियोजनावर मंडळाची नाराजी; अनेक मंडळाचा मिरवणुकीतून बाहेर पडण्याचा मानस







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांची लोणावळ्यातील गणेश मंडळ यांच्या सोबत नुकतीच हॉटेल चंद्रलोक येथे आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी लोणावळ्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी,राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत मंडळाच्या अनेक समस्या मान्यवरांकडून मांडण्यात आल्या.डीजे, नियमित वीजखंडित,रस्त्यांवरील खड्डे, इंद्रायणीच्या पावित्र्य बद्दल गणपती विसर्जनाला येणाऱ्या अडचणी,वेळेवर विसर्जन व्हावे यासाठी दरवर्षी अश्या बैठका घेऊन काय उपयोग होत नाही? त्यामुळे पोलिसांनी यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे मत अनेक गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटिल यांनी विविध पक्षांचे वेगवेगळे स्वागत मंडप करण्यापेक्षा एकाच मंडपात सर्व राजकीय पक्षांनी मंडळाचे स्वागत करावे अशी सूचना मांडली यावर हे लोणावळ्यात शक्य नसल्याचे पदाधिकारी यांनी या सूचनेस ठाम विरोध दर्शवला. रायवूड गणेश उत्सवाचे यंदाचे शतक पूर्ती वर्षं असल्याने त्यांनी देखील आपल्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या,तसेच दरवर्षी पोलिसांच्या मिरवणूक नियोजनाचा अभावामुळे पुढील मंडळाना होत असलेल्या विलंबा मुळे अनेक गणेश मंडळ यांनी मिरवणुकीतून बाहेर पडण्याच्या आपला मानस यावेळी व्यक्त केला.यावेळी व्यासपीठावर लोणावळा नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे,उपगराध्यक्ष देविदास कडू,लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटिल,विज मंडळाचे काळे उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



