ओवळे गावात सुप्रिया वेलनेस आणि फिटनेस ऑनलाईन सेंटर पुणे व पै.अक्षयभाऊ भालेराव मित्र परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

मावळ मराठा न्युज:- ओवळेगावचे सरपंच-श्री.दिलिप शिंदे यांनी स्वतः सहभागी होत केले ह्या उपक्रमाचे कौतुक.नुकतेच ओवळे येथे सुप्रिया वेलनेस & फिटनेस ऑनलाईन सेंटर पुणे यांच्या वतीने तसेच पै.अक्षयभाऊ भालेराव मित्र परिवार ओवळे यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी मोफत मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ह्या कार्यक्रमास डाॅ.हनुमंत कुलकर्णी ,डाॅ.सुप्रिया कुलकर्णी , ओवळे गावचे सरपंच-श्री.दिलिपनाना शिंदे,उपसरपंच-श्री.समिरभाऊ कराळे, ग्रा.सदस्य-पै.तुषारभाऊ साठे,पै.संतोषभाऊ भालेराव, युवा उद्योजक-पै.अक्षयभाऊ भालेराव ,पै.प्रकाशभाऊ भालेराव, पै.सुमितभाऊ भालेराव,श्री.मधुकरभाऊ भालेराव तसेच गावातील अनेक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गावातील अनेक नागरिकांची डाॅक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी केली.व नागरिकांना मानवी आरोग्या विषयी मार्गदर्शन केले.तसेच गावचे सरपंच-श्री.दिलिपनाना शिंदे यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.व ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहुन स्वतःदेखील ह्या शिबिरात सहभाग घेतला.आपल्या आरोग्याची तपासणी केली. व ग्रामस्थांना देखील ह्या शिबिराचा लाभ घेण्यास सांगितले. तसेच ओवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते-शिवभक्त अजित शिंदे यांनी आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page