लोणावळयातील इंद्रायणी नदी म्हणजे मावळची शान,नगरपरिषदेने स्वच्छ आणि पावित्र्य ठेवून राखावा मान,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी





मावळ मराठा न्युज :- लोणावळा, इंद्रायणी नदीला संताची थोर परंपरा आहे. या नदी पात्रात गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन केले जाते. लोणावळा शहरात या नदीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून प्रशासनाने त्यात तातडीने लक्ष घालून नदीची स्वच्छतेबाबत जागृत राहून त्यातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कडून करण्यात आली.लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासीरभाई उर्फ पप्पूभाई शेख, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, प्रदेश उपाध्यक्ष विनोद होगले, राजू बोराटी, रमेश दळवी, दत्तात्रय गोसावी, नारायण जाधव, श्वेता वर्तक, नेहा पवार, अजिंक्य कुटे, संतोष कचरे, रवींद्र भोईने, अमोल गायकवाड, सुधीर कदम, संजय घाडगे, अदिल शेख, प्रवीण करकेरा,साहिल आर्कटी, सलीम मण्यार, आदीं पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. इंद्रायणी नदी चे पवित्र्य राखले जावे आणि तिला प्रदूषणाच्या विळख्यातुन बाहेर काढावी तसेच नदी पात्रालगत असणारे नागरी वस्त्यांमधील मैला मिश्रीत पाणी या पात्रात सोडण्यात येते. त्यामुळे नदीचे पावित्र्य भंग झाले आहे. खरतर या ठिकाणी आधुनिक, विकसित तंत्रज्ञानाचा वापर करुन सदरचे मैलामिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करून त्यावर रिसायकलिंग करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे वितरण नलिका टाकून नगरपरिषदेच्या डोंगरगाव येथील मैलाशुध्दीकरण केंद्रात सदरचे मैला मिश्रीतपाणी संकलित करुन प्रक्रिया करणे शक्य असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाकडून तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळोवेळी इंद्रायणी नदी पात्र स्वच्छतेबाबत दिशानिर्देश झाले असतांना देखील नगरपरिषदेकडून वरील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जात नसल्याने सदर बिकट स्थिती दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे. नगरपरिषदेने या कामाला प्राथमिकता देऊन किमान आगामी सार्वजनिक गणेशोत्सवापूर्वी लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील इंद्रायणी नदी पात्रात नागरी वस्तीचे मैलामिश्रीत पाणी येणार नाही, याकरिता ठोस उपाय योजना कराव्यात आणि नागरीकांच्या धार्मीक भावना जपाव्यात अशी मागणी यात करण्यात आली आहे.




