परिपूर्ण फूड्स प्रोडक्ट्स ना भरघोस प्रतिसाद,पणन मंत्री जयकुमार रावल यांनी परिपूर्ण फूड्सच्या स्टाॅलला भेट

मावळ मराठा न्युज -पुणे,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे यांनी गणेश कला, क्रीडा मंच स्वारगेट,पुणे येथे सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या मिलेट महोत्सवात परिपूर्ण फुडस् च्या आरोग्यदायी व स्वादिष्ट मिलेट प्राॅडक्टस् ना चोखंदळ पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.परिपूर्ण फूड्स चे संस्थापक श्री सोपान आघाव यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, परिपूर्ण ची सर्व उत्पादने ही आरोग्यासाठी हितकर आहेतच शिवाय स्वादिष्ट आणि रूचकर ही आहेत.यामुळेच मागील ६-७ महिन्यात १० हजार पेक्षा जास्त संतुष्ट ग्राहकांनी बाकरवडी चाखली आहे.परिपुर्ण मिलेटच्या प्रसारासाठी कटिबद्ध असून,परिपूर्ण ने नाविन्यपूर्ण मिलेट प्रॉडक्ट्स जसे की ज्वारीची बाकरवडी, ज्वारीचा चिवडा, मिलेट कचोरी, नाचणी लाडू, मिलेट नमकीन इत्यादी प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत.आगामी काळात परिपूर्ण च्या उत्पादनांना असाच भरघोस प्रतिसाद मिळत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व पुणेकरांचे आभार व्यक्त केले.मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पणन व राजशिष्टाचार मंत्री (महाराष्ट्र राज्य) श्री जयकुमार रावल यांनी परिपूर्ण फूड्स च्या स्टाॅल ला भेट दिली व शुभेच्छा दिल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page