फडणवीस साहेब,१५ नाही २० दिवस घ्या; पण प्रश्न सोडवा राजू शेट्टींचा सरकारला इशारा !५० ५५ वर्षे स्थानिक नेतृत्व प्रश्न सोडवू शकले नाही ही गोष्ट भूषणावह नाही

मावळ मराठा न्युज -मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर पवना धरणग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु, धरणग्रस्तांचा लढा संपलेला नाही,असे राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही सरकारला २० दिवसांचा अल्टिमेटम देऊन या काळात प्रश्न मार्गी न लागल्यास २२ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना घेऊन दुप्पट ताकदीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सर्वच स्थानिक नेते आणि पक्षानी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत आपल्या भूमिका मांडल्या.

शेवटच्या दिवशी आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यात आम्ही शेतकऱ्यासोबत आहोत असे सांगतात परंतु आंदोलनाचे नेतृत्व राजू शेट्टी करत असतील तर आम्ही आंदोलनात जाणार नाही अशी भूमिका महायुती च्या स्थानिक नेत्यांनी घेतली. त्यामुळे आपला इगो महत्वाचा? कि आपले आंदोलन कर्ते बाधित शेतकरी? असा प्रश्न नक्कीच मावळ तालुक्यातील शेतकरी यांना पडला. ५ दशक हुन अधिक काळ सदर विषय सोडवता आला नाही,राजूशेट्टी हे अभ्यासू आणि जाणते शेतकरी नेते आहेत. त्यांचे नेतृत्व जर मावळातील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत असतील तर त्यात वावगं काय असा असा सवाल आंदोलन कर्ते विचारत आहेत.राजू शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले पक्ष,पार्टी गेली उडत,माझा शेतकरी ला न्याय मिळाला पाहिजे यात गैर काय? त्यामुळे महायुतीतील दळवी,रवींद्र भेगडे,सूर्यकांत वाघमारे रघुवीर शेलार यांचे विशेष कौतुक केले पाहिजे त्यांनी पक्षाची पर्वा न बाळगता माझा शेतकरी आणि त्याचे हित पाहिले आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी झाले.

पवना धरणग्रस्त आणि पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले होते. धरणग्रस्तांचे ५०,५५ वर्षे रखडलेले पुनर्वसन,संपादित जमिनींचे प्रश्न आणि पवना बंदिस्त जलवाहिनी कायमस्वरूपी रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. परंतु, गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी येत्या पंधरा दिवसांत या संदर्भात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.या वेळी आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे,भाजपाचे रवींद्र भेगडे, रघुवीर शेलार,नारायण भालेराव,मनसेचे अशोक कुटे,शिवसेनेचे भारत ठाकूर,आशिष ठोंबरे,पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष नारायण बोडके, बाळासाहेब मोहोळ, दत्ता ठाकर, रवी ठाकर,पवना बंद जलवाहिनीविरोधी समितीचे समन्वयक ज्ञानेश्वर दळवी, सचिव माऊली सोनवणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, धरणग्रस्त शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. मात्र, चर्चा केवळ औपचारिक न राहता त्यातून ठोस निर्णय झाला पाहिजे, अशी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतर शेट्टी यांनी त्यात आणखी पाच दिवसांची भर घालत सरकारला २० दिवसांचा अल्टिमेटम दिला.दरम्यान, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वप्निल मोरे, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून राजू शेट्टी व शेतकरी बांधवांकडून निवेदन स्वीकारले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page