हरवले आहेत!!मुळशीच्या देवघर गावातून लोणावळ्याचें जेष्ठ नागरिक बेपत्ता

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,इंदिरा नगर न्यू तुंगारली ,लोणावळा येथील रहिवाशी असलेले दत्तू मारोती आढाव वय वर्ष ७३ हे जेष्ठ नागरिक देवघर, मुळशी येथे आपल्या नातवाच्या घरी देवाच्या कार्यक्रमाला दिनाक १६ फेब्रुवारी रोजी गेले होते.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवाच्या कार्यक्रम झाल्यानंतर ते गावात फिरायला गेले असता परत आलेच नाही .नातेवाईक आणि गावकरी यांनी संपूर्ण गाव,गावातील मंदिर सर्व जागी शोधून काढले तरी ते मिळून आले नाहीत. या संदर्भात अविनाश वामन राऊत वय वर्ष २४ राहणार देवघर ,मुळशी यांनी पौड पोलीस स्टेशन येथे मिसिंग ची तक्रार दाखल केली असून पोलीस व नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.दत्तू मारोती आढाव यांचे वर्णन खालील प्रमाणे क्रीम कलरचा शर्ट,पांढरा पायजमा,डोक्यावर टोपी, उंची ५ फूट, सावळा रंग अश्या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास किंवा सापडल्यास खालील नंबर वर संपर्क करावा ८२६३०२६१३८,९५१८३८१८१६,आणि ७३८५८५६००४ असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. सदर केस ची तपास पौड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार करीत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page