अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघ राजकारण्याची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही; जाहीर निषेध

मावळ मराठा न्युज – मावळातील स्वाभिमानी आणि निष्पक्ष काम करणाऱ्या पत्रकारांच्या मागे ठाम अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघ नक्कीच उभा राहीन. राजकारण्याची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.सत्ताधारी असोत वा विरोधी पक्षाचे त्यांना त्यांची जागा अखिल भारतीय पत्रकार मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघ नक्कीच दाखवल्याशिवाय राहणार नाही.परंतु पत्रकारांनी देखील आपले इथीक्स आणि जबाबदारी नक्कीच पाळली पाहिजे. पत्रकारांची प्रतिमा मलीन करणाऱ्या पाकीट पत्रकारांना दूर ठेवले पाहिजे, मावळात काही पाकीट पत्रकार आहेत म्हणुनच राजकारण्यांची एवढी हिम्मत आणि आत्मविश्वास वाढला आहे.काही पत्रकार लोकप्रतिनिधी कडे पगारावर काहीपत्रकार पोलिसांच्या पाकिटावर बातम्या टाकत असतात. त्यामुळे राजकारण्याची एवढी हिम्मत आणि मजल झाली आहे. पत्रकाराने आपला स्वाभिमान अभिमान कुठल्या विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधू नये. आम्ही देखील गेली २७ वर्षे साप्ताहिक मावळ नागरिक च्या माध्यमातून स्वाभिमानाने आणि अभिमानाने पत्रकारिता करीत आहोत. या २७ वर्षात खूप उतार चढाव आम्ही पाहिलेत. पत्रकारांनी एक लक्षात ठेवले पाहिजे राजकारणी कधी सत्तेत असतील,कधी विरोधात,मावळात या सत्तावीस वर्षात रुपलेखा ताई ढोरे,डिंगबर दादा भेगडे १० वर्षे,संजय बाळा भेगडे १० वर्षे आता सुनील शेळके दोन टर्म आमदार म्हणून आहेत. पण संपादक हा असा हुद्द्या आहे त्याचे हे पद कोणी ही काढू शकत नाही.त्यामुळे किती आमदार येतील आणि किती आमदार जातील. त्यामुळे पत्रकार यांनी आपला अभिमान आणि स्वाभिमान कुणाच्या दावणीला बांधू नका,तुमचे मत परखड मांडा,शॉर्ट कट वापरू नका, पत्रकारांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे गेले पाहिजे.चुकेल त्या लोकप्रतिनिधी ला आपल्या शब्दांनी झोडपलेच पाहिजे,आणि चांगले काम करणाऱ्याचे कौतुक सुद्धा केले पाहिजे. पत्रकारितेचा जनरल आणि साधा नियम असा आहे कि सत्ताधाऱ्याचा विरोधातच त्याचा चुका दाखवण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने मावळ तालुका अध्यक्ष सचिन ठाकर,अमीन खान,विजय सुराणा, ऍड संजय पाटील, श्रीराम कुमठेकर यांनी देखील पत्रकारांना गृहीत धरणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्या राजकारण्यांचा जाहीर निषेध करतो.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page