समाजसेवक अण्णा हजारे यांचे वाढदिवसा निमित्त आळंदीत संत लीला भूमीत वृक्षारोपण




मावळ मराठा न्युज :-आळंदी : जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवस निमित्त आळंदी येथील संत लीला भूमीत विविध देशी वृक्षांचे रोपण करीत पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संवर्धनाने वाढदिवस आवश्य्क खर्चाला फाटा देऊन साजरा करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज यांचेकडे अण्णांचे दिर्घ आयुरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. वाढदिवसा निमित्त आवळा, करंज, फणस, आंबे, चिंच, कडुलिंब, शिसु असे ७५ वृक्ष लावण्यात आले. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी, पुणे जिल्हा समिती, खेड तालुका समिती, आळंदी शहर समिती पदाधिकारी, समिती सदस्य यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आळंदीत विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला. यासाठी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे वतीने देशी वृक्ष उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी सार्वजनिक वनीकरण विभागाचे अनिल लांडगे, वनपाल गुलाब मुके, सोपान अनासूने, वांसेवक बाळासाहेब कोहिनकर, दत्त कारले, वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण संतोष कंक, वनपाल सचिन जाधवर, वनरक्षक अचल गवळी , सहाय्यक अजय कोळेकर, गणेश भामरे यांनी वृक्ष तयार करण्यासह वृक्ष वाढीसाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी जनसंसदचे पुणे जिल्हा अध्यक्ष पै. बाळासाहेब चौधरी, खेड तालुका समिती अध्यक्ष प्रकाश पाचारणे, आळंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, बाळासाहेब वहिले, ओंकार पवार, मारुती साळुंखे, राजेश नागरे, अमर गायकवाड, सोमनाथ बेंडाले, सतीश चांभारे, सिताराम आरुडे गुरुजी, बाळासाहेब पाचरणे, गंगाधर जैद, गोविंद बुट्टे, तुकाराम मुंढे, माऊलीदास महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना दिर्घआयुरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमांत आळंदी सिद्धबेट येथे गेल्या तीन वर्षां पासून वृक्षारोपण करण्यात येत असून विविध सेवाभावी व्यक्ती, संस्था यांचे माध्यमातून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृतीचे कार्य आळंदी जनहित फाउंडेशनचे माध्यमातून आळंदी नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्याने केले जात आहे. सिद्धबेट येथे संतलीलाभूमीचे वैभव वाढविण्यासाठी आळंदी नरपरिषदेच्या माध्यमातून कार्य सुरु असून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेसह विविध सेवाभावी व्यक्ती संस्था यांचे प्रयत्न यासाठी केले जात आहेत. याच कार्याचा भाग म्हंणून अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपण करीत जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. संयोजन अर्जुन मेदनकर, पै. बाळासाहेब चौधरी, प्रकाश पाचारणे यांनी केले. आभार खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांनी केले.




