तळेगाव दाभाडे,शिरगाव पोलीस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था टिमची कार्यतत्परता, नदीकाठी अडकलेल्या महिलेचा वाचवला जीव





मावळ मराठा न्यूज़ -गोंडुब्रे,साधारण ४८ तासा पासून मावळ तालुक्यात पावसाचा हाहाकार उडाला असताना १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साधारण साडे बाराच्या सुमारास गोंडुंब्रे येथील नदी लगत कोणी तरी वाचवा असे आवाज देत असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ला ग्रामस्थांनी कळविले असता पोलीस प्रशांत सोनवणे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे यांना दिली लगेच संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन समितीला कळवले त्या अनुषंगाने जवळपासचे टिम सभासद विनय सावंत, कमलेश राक्षे तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे काही अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले ताबडतोब मुसळधार पावसात देखील मदत कार्य करत त्यांनी त्या महिलेस एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमधून सुखरूप बाहेर काढलेले आहे.सदर ठिकाणी अडकलेली त्या महिलेस प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.



