*ज्येष्ठ पत्रकार साखवळकर यांचा लोणावळ्यात सहस्त्रचंद्रदर्शंन सोहळा*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दि १३ ज्येष्ठ पत्रकार पंडित सुरेश साखवलकर यांनी नुकतीच वयाची ८०वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले,यानिमित्त लोणावळा येथील पंडित सुरेश साखवकर स्नेही परिवाराच्या वतीने त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी होते.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक अरविंद मेहता, धीरूभाई कल्याणजी,उद्योगपती नंदकुमार वाळंज,भरत आगरवाल नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी कार्ला गावचे उपसरपंच किरण हुलावळे उपस्थित होते. पुणेरी पगडी,शाल श्रीफळ, मानपत्र,व स्मृतिचिन्ह प्रदान करून यावेळी साखवलकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मिलिंद जोशी यांनी साखवळकर यांच्या गेल्या साठ वर्षातील ,पत्रकारिता,सामाजिक व संगीत क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.साखवळकर यांनी वरील सर्व क्षेत्रात दीपस्तंभांप्रमाणे कार्य केले असून, समाजाला दिशा देण्याचेही कार्य त्यांनी केले असल्याचे ते म्हणाले. लोणावळेकरानी एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सन्मान केला असून तो माझ्या हस्ते व्हावा हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले.पंडित सुरेश साखवळकर हे एक चालतेबोलते विद्यापीठ असून, आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग त्यांनी समाजाकरीता सतत केला असे ते म्हणाले.,अशी व्यक्तिमत्वे समाजामध्ये पोषक तत्वे रुजवतात असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना साखवलकर यांनी लोणावळेकर व कार्यक्रम सोहळा समितीचे ऋण व्यक्त केले. लोणावळा शहराने आपल्याला पहिल्यापासून प्रेम आणि आदर दिला असून,त्याचा मी कधीही उतराई होऊ शकत नाही असे ते म्हणाले. लोणावळा शहर सांस्कृतिक दृष्ट्या पुढे जावे याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धीरूभाई कल्याणजी यांनी ३५वर्षांच्या त्याच्या व साखवळकर यांच्या ऋणानुबंधाचे,अनुभव कथन केले,वाळंज यांनी बोलताना साखवळकर हे आधुनिक ऋषी असून, समाजास दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगितले.प्रास्ताविकात अरविंद कुलकर्णी यांनी साखवळकर यांच्या पत्रकारिता, संगीत,व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला, या सर्व क्षेत्रातील ते अवलिया आहेत असे ते म्हणाले. यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कवीश्वर,माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर,ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष पांडुरंग तीखे,मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी,बापूलाल तारे यांचेसह मान्यवर उपस्थित होते,संजय अडसुळे,मिलिंद खळदकर,सुनील कोपरकर,ब्रिन्दा गणात्रा पै रमेश पालेकर व सहकाऱ्यांनी संयोजन केले. राजेश मेहता यांच्या अभंग गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन सुरेश गायकवाड , व प्रशांत पुराणिक यांनी केले.आभार किरण हुलावळे यांनी मानले.मीनाक्षी गायकवाड यांच्या भैरवी ने सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page