सचिन पाटील यांची तडकाफडकी बदली ; महेश विधाते यांनी स्वीकारला लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा पदभार






मावळ मराठा न्युज -लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी महेश विधाते यांची अनपेक्षित नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम उघडणार असल्याचे विधाते यांनी सांगितले. मी माझी ओळख माझ्या कामातून करून देईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.भुशी येथील ऍड.अभय मराठे हत्या प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेखर उर्फ आप्पा कुलकर्णी,पोलीस कॉन्स्टेबल वीरसेन गायकवाड यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.लोणावळ्यात जबाबदारी स्वीकारलेले महेश विधाते यांनी यापूर्वी गडचिरोली,सोलापूर आणि पुणे ग्रामीण यांसारख्या विविध भागांत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. हत्यांसारख्या गंभीर प्रकरणांचा तातडीने तपास लावून ते उघडकीस आणले आणि आरोपीना आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात ते यशस्वी झाले आहेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि खडतर भागात बजावलेली सेवा, तसेच पोलीस दलातील आव्हानात्मक कामगिरीबद्दल त्यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.लोणावळा शहराची जबाबदारी हाती घेतल्यानंतर बोलताना महेश विधाते म्हणाले, “पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याला आमचे पहिले प्राधान्य असेल. पर्यटकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी,स्थानिक नागरिकांची शांतता अबाधित ठेवली जाईल. शहरातील अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीविरुद्ध आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमाणे कठोर आणि व्यापक मोहीम हाती घेतली जाईल.” असेही विधाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांची तडकाफडकी बदली लोणावळा शहरात अल्पावधीत आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांची भुशी येथील अॅड. अभय मराठे हत्या प्रकरणानंतर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास करताना लोणावळा पोलिसांनी हजगर्जीपणा केला असल्याचा वरिष्ठांनी ठपका ठेवत या बदल्या केल्या असल्याचे सांगितले जात आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस स्टेशन ला आलेल्या नागरिकांचे बोलणे ही ऐकून घेत नव्हते अश्या बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी यायला लागल्या होत्या.पोलीस हे जनतेचे सेवक असतात,नागरिक तुमच्या कडे मोठ्या अपेक्षेने न्याय मिळावा यासाठी येत असतात. पोलीस स्टेशनला आलेल्या नागरिकांचा सन्मान करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य असते.पोलिसांचा गुन्हेगारावर वचक असावा हे जरी खरे असले तरी सर्वच नागरिकांशी त्याच पद्धतीने बोलणे योग्य नाही.नागरिकांशी आदराने बोलणे,नागरिकांशी नेहमी संपर्कात राहणे यात गुन्ह्याचा शोध घेण्यात मदतच होत असते.परंतु सचिन पाटील यांनी आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत काही चांगला ठसा उमटवला नाही. सचिन पाटील आलेत आणि गेलेत लोणावलेकराना त्याने काही फरक पडला नाही.परंतु नवीन आलेले पोलीस निरीक्षक महेश विधाते यांचे नागरिकांशी संवाद साधण्याची पद्धत,आलेल्या नागरिकांशी आपुलकीने बोलणे नक्कीच कौतुकास्पद आहे.आणि त्यांनी सांगितले कि मी माझ्या कामाने माझी ओळख निर्माण करीन ही गोष्ट देखील त्यांची नक्कीच आशादायी आहे.लोणावळा शहर पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना पुढील वाटचालीस मावळ मराठा न्युज कडून हार्दीक शुभेच्छा.



