बांधकाम व्यावसायिक पुरोहित लोणावळा नगरपरिषदेचा जावई आहे का? नैसर्गिक नाल्यावरील केलेले बेकायदेशीर बांधकाम का पाडत नाही? यात कोणाचे आर्थिक हित संबंध आहेत?

मावळ मराठा न्युज लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने डेनकर कॉलनीचे बाजूचे सर्वे नं. १३४ ,भु.क्र.१ बी/६ ,वॉर्ड वलवण येथील बांधकाम व्यावसायिक पुरोहित ह्यांचे नैसर्गिक नाल्यावरील केलेले बांधकाम पाडण्यासाठी दिनांक २१ जुलै २०२६ रोजी नोटीस पाठवली होती. परंतु आज दिनांक १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्या नैसर्गिक स्रोत बंद करणाऱ्या आणि नाल्यावर ७० मीटर म्हणजे २१० फूट लांब x ६ मिटर म्हणजे १८ फूट रुंद आर.सी.सी स्लॅब व कुपन भिंत ७० मीटर लांब x २ .५० मीटर ऊंच बांधकाम केले आहे, असा अहवाल स्थळ पाहणी करून पालिकेला प्राप्त झालेला असताना प्रसाशन कोणाची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल पासलकर यांनी केला आहे. असे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डर पुरोहित यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हेच एखाद्या छोट्या टपरी धारक आणि छोट्या दुकानदारांवर लोणावळा नगरपरिषद तत्परता दाखवून लगेच कारवाई करते. परंतु या पुरोहित बिल्डर ला लोणावळा नगरपरिषदेने नोटीस पाठविल्या शिवाय कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणजे यात पालिका प्रशासन यांचे बिल्डर सोबत कुणाचे आर्थिक हित संबंध आहेत का? कोणाच्या आशिर्वादामुळे या बिल्डर वर तक्रार देऊन,पालिकेने नोटीस देऊनही कारवाई होत नाही याचा अर्थ काय? हे सांगण्याची आवश्यकता नाही. यामध्ये तक्रादार पासलकर यांनी सतत पाठपुरावा करून देखील लोणावळा नगरपरिषद कोणतीही कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यावेळी ५ जुलै च्या पावसाने संपूर्ण लोणावळ्यात विशेषतः भांगरवाडी,नांगरगाव, हुडको, तुंगार्ली परिसरात आहाकार माजला. त्याला अशी पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद केल्याने पूर स्थिती निर्माण होत असते.परंतु ऐन वेळी प्रशासनाने दिखावा म्हणून धावपळ करण्यापेक्षा अशी बांधकामे तक्रार आल्यावर सुद्धा तसेच त्या अनधिकृत बांधकामची स्थळ पाहणी करून देखील कारवाई का केली जात नाही? यात नेमके कोणते? आणि कोणाचे आर्थिक हितसंबधं आहेत हे पालिकेने स्पष्ट करावे.याकडे हायकोर्ट कमिटीने लक्ष देऊन पुरकाळात धावपळ करण्यापेक्षा असे नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद करणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या पुरोहित बिल्डर वर त्वरित कारवाई करून त्याचे अनधिकृत बांधकाम पाडावे अशी मागणी तक्रारदार राजेश पासलकर, वलवण,लोणावळा यांनी मावळ मराठा न्युज कडे केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page