नैसर्गिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ‘शिक्षणग्राम’मध्ये ४.५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भव्य उद्घाटन







मावळ मराठा न्युज -लोणावळा (देवले)’मायटर ब्रँड’ (MITER BRAND) कडून सीएसआर (CSR) अंतर्गत २५ लाख रुपयांची देणगी; पुढील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला.गेल्या १८ वर्षांपासून बेघर आणि निराधार मुलांचे संगोपन करणाऱ्या नैसर्गिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेच्या ‘शिक्षणग्राम’ या प्रकल्पात तब्बल ४.५ लाख लिटर क्षमतेच्या भव्य पाण्याच्या टाकीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, जानेवारी २०२६ मध्ये या प्रकल्पाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. ‘मायटर ब्रँड’च्या (MITER BRAND) सीएसआर निधीतून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे.प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि भागीदारी २०२५ मध्ये श्री. मंठू. सौ. स्नेहा आणि श्री. निलेश यांच्या पुढाकाराने ‘मायटर ब्रँड’च्या सीएसआर उपक्रमाची ओळख संस्थेशी झाली. यानंतर ‘मायटर बँड’चे प्रमुख श्री. विनोद नायर, श्री. अभिजीत जोशी आणि श्री. अमित वंगला यांनी ‘शिक्षणग्राम’ला दोन वेळा भेट दिली. येथील मुलांच्या गरजा आणि संस्थेचे कार्य पाहून त्यांनी या भव्य पाण्याच्या टाकीच्या उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा सीएसआर (CSR) निधी देण्याचे मान्य केले.उद्घाटन सोहळा जानेवारी २०२६ मध्ये या महाकाय पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले. श्री. विनोद नायर, श्री. अभिजीत जोशी आणि श्री. अमित वंगला यांच्या प्रमुख उपस्थितीत या जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नैसर्गिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश मून आणि सचिव सौ. योगिता मून प्रामुख्याने उपस्थित होते.श्री. सतीश मून (अध्यक्ष): “मायटर ब्रँडसोबतची ही असाधारण भागीदारी आणि त्यांनी दिलेली २५ लाख रुपयांची देणगी आमच्या संस्थेचे संपूर्ण चित्र बदलणारी आहे. या भव्य पाण्याच्या टाकीच्या निर्मितीमुळे पुढील ५० वर्षे ‘शिक्षणग्राम’मधील कोणत्याही मुलाला किंवा काळजीवाहू कर्मचाऱ्याला पाणीटंचाईची चिंता करावी लागणार नाही. हा प्रकल्प आमच्यासाठी एक मोठा आधार आहे.”सौ. योगिता मून (सचिव): आभार प्रदर्शन करताना सौ. योगिता मून म्हणाल्या, “समाजाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, येथील गरजा अचूक ओळखण्याची क्षमता आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना पुरवण्यासाठी पुढे आल्याबद्दल आम्ही सर्व लाभार्थी आणि कर्मचारी ‘मायटर ब्रँड’चे नेतृत्व आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अत्यंत आभारी आहोत.”या नवीन प्रकल्पामुळे’शिक्षणग्राम’मधील शेकडो मुलांच्या जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल घडणार असून, पाण्याचा मूलभूत प्रश्न कायमचा सुटल्याने संस्थेच्या पुढील वाटचालीसा मोठे बळ मिळाले आहे.



