लोणावळा महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस १३२ व्या जयंती निमित्त अभिवादन


मावळ मराठा न्यूज :-लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती. एस ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस १३२ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.सदर प्रसंगी लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे सचिव श्री. दत्तात्रय पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले. सदर प्रसंगी लोणावळा महाविद्यालयाचे प्रभारी शारीरिक शिक्षण संचालक श्री. दिपक तारे, तेजस भांगरे, सतीश गायकवाड, राकेश साळुंके, बाळशीराम केवाळे, सचिन फटक आदी उपस्थितीत होते.




