दारूंब्रे,पवनमावळ येथे कृषी माऊली’ किट वाटप: देवाभाऊ कृषी माऊली सोहळा संपन्न









मावळ मराठा न्युज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांना शेतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करणारा एक नाविन्यपूर्ण प्रयोग प्रत्यक्षात साकारत आहे.भारतीय जनता पार्टी भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी उपस्थित मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे , कार्यक्रम प्रभारी स्नेहलताई दगडे ,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर ,पवन मावळ मंडल अध्यक्ष दत्ताभाऊ माळी ,पवन मावळ उपाध्यक्ष यादव सोरटे ,मा.सरपंच हिरामण सोरटे ,सरपंच मीनाताई माळी , कृषी सखी वंदना सोरटे, चैत्राली गराडे , वैशाली घारे , शैला मुर्हे , संगीता राक्षे ,मिनाक्षी सोरटे ,रेश्मा सोरटे ,छाया सोरटे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्यामहिला शक्तीच्या कल्पकतेला आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा देणारा हा प्रयोग महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात एक नवा इतिहास रचेल.कृषी माऊली’ किट वाटप: महिलांचे श्रम कमी करण्यासाठी एका पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, शेती उपयोगी अवजारे (खुरपे, विळा) आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च इत्यादी वस्तू किट मध्ये देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सायलीताई बोत्रे यांनी केले स्वागत जिल्हा चिटणीस मृदुला भावे यांनी केले सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस सुमित्रा जाधव यांनी केले.



