भारत रमेश चिकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मावळ तालुका सरचिटणीस पदी निवड

मावळ मराठा न्युज वडगांव, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी मावळ तालुका वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने कृतज्ञता मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्या मध्ये आपले मावळचे लोकप्रिय आमदार श्री.सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते तसेच मावळ तालुका अध्यक्ष श्री.गणेश भाऊ खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.भारत रमेश चिकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मावळ तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. ह्या वेळी उपस्थितामध्ये मावळ तालुका सुकानू समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आणि लोणावळा,वडगाव, तळेगाव मधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक,नगरसेविका, नगराध्यक्ष व लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.रवीभाऊ पोटफोडे उपस्थित होते.मावळ मराठा न्युज परिवाराकडून त्यांचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page