डॉ खुणे यांनी दिले कै.मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना इव्हेंट मॅनेजमेंटचे धडे


मावळ मराठा न्यूज:- पिंपरी (प्रतिनिधी) इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये यशस्वी करियर करायचे असेल तर काळ, वेळ,घडी आणि घटका याचे भान राखून नियोजन करणे गरजेचे आहे. हल्ली धकाधकीच्या काळात बारसे,हळद, विवाह, पुनर्विवाह, आणि शास्त्रशुद्ध पध्दतीने अंत्यविधी करण्याचे स्टार्ट अप सुरू केले आहे. कार्यक्रम नियोजनामुळे (इव्हेंट मॅनेजमेंट) तरुणांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होत असून आयोजकांवरील ताण कमी होत आहे.अशा शब्दांत असे मत कॅंप एज्युकेशन सोसायटीचे डॉ तेलंग कॉलेजचे डॉ. दत्तात्रय खुणे यांनी धडे दिले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित आकुर्डी येथील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या वतीने १९ एप्रिल २०२३ रोजी ‘कार्यक्रम व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. डॉ दत्तात्रय खुणे पुढे म्हणाले कि, हॉटेलमध्ये इव्हेंट्स राबविण्याची यंत्रणा अस्तित्वात आली आहे. त्यांनी आपल्या मनोगतमधून व्यक्तीच्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतच्या सुखदुःखाच्या सर्व प्रसंगामध्ये कशाप्रकारे कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले जाते याविषयी विविध उदाहरणाच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टीकोनातून कशाप्रकारे पाहावे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी पुस्तकीय ज्ञाना बरोबर व्यावसायिक बाजूने समाजामध्ये संधी शोधून एक चांगला व्यावसायिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. वाणिज्य विभागामार्फत द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यवस्थापनातील विविध विषयांवर आधारित वेगवेगळ्या पाहुण्यांचे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो डॉ एच. बी. सोनावणे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. इंगोले, व्यवस्थापन सप्ताहाचे समन्वय डॉ दिलीप कोतकर डॉ. सारिका मोहोळ प्रा. प्रिती गौड यांनी आयोजन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु प्राजक्ता ताम्हाणे हिने केले आभार प्रदर्शन कु दिपाली घुले केले.




