६ जुनला मोर्चा संदर्भात मातंग समाज जागृती अभियान अंतर्गत दुसरी बैठक,आनंद नगर चिंचवड स्टेशन येथे संपन्न – चंद्रकांत दादा लोंढे

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,प्रतिनिधी,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मेट्रो स्टेशन होत असून या मेट्रो स्टेशन मुळे स्मारक पूर्णपणे झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाच्या विरोधात भव्य मोर्चा संदर्भात सायंकाळी सात वाजता वाजता आनंद नगर झोपडपट्ट्यातील कार्यकर्त्याची मीटिंग आयोजित करण्यात आली या मीटिंगचे नियोजन आण्णासाहेब कसबे यांनी केले होते. मिटींगचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते संदिपान झोंबाडे यांनी भव्य मोर्चा संदर्भात समाज बांधवांना सूचना केल्या,त्यात पुढील मुद्दे मांडले.१) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक शेजारील महा मेट्रोचे काम व कामाचे ठिकाण बदलण्यात यावे.२ ) सांस्कृतिक भवन निगडी येथील मातंग समाजासाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण केलेल्या सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. व सांस्कृतिक भवन समाज बांधवांसाठी खुले करण्यात यावे.३ ) संत तुकाराम नगर येथील हाफकींच्या जागेमध्ये बार्टी च्या धरतीवर आर टी ची स्थापना करण्यात येण्यासाठी दहा वर्षांपूर्वी ठराव मंजूर केलेल्या महानगरपालिकेच्या ठरावावर लवकरात लवकर तोडगा काढून केंद्र शासनाकडून सदर जागा हस्तांतरित करून घेण्यात यावी व आर टी चे काम त्वरित चालू करावे. या सर्व मूलभूत मुख्य विषयांवर चर्चा केली. यावेळी जयंती महोत्सव अध्यक्ष अण्णासाहेब कसबे उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, युवराज दाखले,आबा मांढरे, वसंत वावरे, विठ्ठल कळसे, यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी आनंद नगर मधील दशरथ कांबळे, प्रसाद क्षिरसागर,राज क्षिरसागर,ओम् चव्हाण,चैत्य खलसे, रामेश्वर डोलारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे,अरिहन गायकवाड, रामेश्वर डोलारे, निलेश डोलारे, अनिल चांदणे, विश्वजित डोलारे, सुजित कसबे, मंगेश आवटे,सागर इंद्रा आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page