*कुसगाव खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र शिबिराला प्रचंड प्रतिसाद*


मावळ मराठा न्युज -कुसगाव खुर्द, ता. मावळ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान-२०२६’ अंतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचे शिबिर कुसगाव खुर्द येथे उत्साहात पार पडले.मंडळ अधिकारी खडकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश शिवराम लालगुडे यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात नागरिकांना डिजिटल व नवीन रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग नोंदणी, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, डिजिटल सातबारा, वारस नोंद, फेरफार, Farmer ID यासह विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. तसेच मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. जितेंद्र ठाकूर व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना शासकीय योजना, प्रमाणपत्रे व उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.या कार्यक्रमास आदर्श सरपंच सौ. सारिका गणेश लालगुडे, सौ. सारिका शिंदे, अनिल लालगुडे, नामदेव येवले, निकिता लालगुडे, ज्योती लालगुडे, राजकुमार बिरादार, संदीप तनपुरे, मोहनसिंग चितोडिया, पोलीस निरीक्षक आकाश पवार, मंडळ अधिकारी निलेश अवसरमोल, चेतन राठोड, ग्राम महसूल अधिकारी विश्वनाथ बागुल, डॉ. सौ. सृष्टी भुसेवार, लक्ष्मीकांत ठाकूर, सौरव विनायक शिंदे, आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या अखिल भारतीय पत्रकार संघाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश शिवराम लालगुडे यांनी केले, तर आभार योगेश येवले यांनी मानले.



