लायन्स क्लब लोणावळा,खंडाळा यांच्या नवीन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष म्हणून ला.कांता ओसवाल यांची निवड







मावळ मराठा न्युज-लोणावळा, ७ जुलै २०२५: लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या लायनिस्टिक वर्ष २०२५-२६ साठी नवीन कार्यकारिणीच्या स्थापना सोहळ्याचे आयोजन हॉटेल चंद्रलोक, लोणावळा येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी ला. कांता पोपट ओसवाल यांची अध्यक्षपदी, लायन निराली नळेकर यांची सचिवपदी आणि लायन अश्विनी कदम यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. स्थापना सोहळा MJF लायन जितेंद्र मेहता (आंतरराष्ट्रीय संचालक, एंडोर्सी) यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून MJF लायन श्रेयस दीक्षित (फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) आणि लायन देवल पारेख (झोन चेअरमन) उपस्थित होते. या वेळी सेवा सद्भावना पुरस्कार: त्यांचे उल्लेखनीय कार्याकरिता सीझफायर फाउंडेशन, लोणावळा मनशक्ती केंद्र, लोणावळा या संस्थांना देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थित होती डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पॉपट ओसवाल, देवेन्द्र नालेकर, अभय जैन, अँड प्रफुल लुंकड, अमित लुनावात, विरेंद्र पारेख, विरल गाला, जुबेर शामशी, प्रकाश जैन, आशिष पॉन, मनोज लुंकड, राजू शिंदे, जिगर पटवा, राजू राजपूत, डॉ. रितेश खंडेलवाल, रोहित व मनीषा थोरात सीमा पारेख, रिंपल पटवा, शाजिया शामशी, डॉ. लीना पॉन, सुरुची खंडेलवाल, कोमल जैन, रंजू लुनावत, जयश्री सुराणा, चार्मी पारेख, इतर मान्यवर उपस्तित होते ला. ऑफ द एअर पुरस्कार दीपाली गाला यांना देण्यात आला. कार्यक्रम मैत्रीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. “नो गिफ्ट, नो बुके, केवळ अॅक्टिव्हिटी डोनेशन स्वीकारले जाते” या उद्दिष्टाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली व अनेक मान्यवरांनी रोख स्वरूपात सेवा कार्याकरिता देणग्या दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ला. निराळी नालेकर व आभार प्रदर्शन डॉ.दिलीप सुराणा यांनी केले.




