पुनावळे येथील लोटस स्कूलच्या परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद


मावळ मराठा न्यूज,पिंपरी(प्रतिनिधी) पुनावळे येथील लोटस बिझनेस स्कूलच्या वतीने “-सिनोव्हिजन-२३” विषयीच्या दोन दिवशीय परिसंवाद व चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी टेक्नोफोर इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत नानजकर, फार्म ईआरपीचे सहसंस्थापक संजय बोरकर,एवन्स लॅबचे संचालक अतुल काळूस्कर, लोटस बिझनेस स्कूलचे विश्वस्त चारूदत्त बोधनकर,संचालक डॉ सतीश वरपडे आदी उपस्थित होते.यावेळी नानजकर म्हणाले कि,स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर काळानुरूप तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. कंपन्यामध्ये संशोधन कार्यात सातत्य ठेवून नवनवीन कल्पना अमलात आणल्या पाहिजेत. अन्यथा नोकियासारखी अवस्था होईल. असा सल्ला शेवटी दिला. दुपारच्या सत्रात एजाइल टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित चर्चासत्रात स्ट्रीबेन हेल्थकेअरचे सीईओ अरविंद सावरगावकर,नायक्रोम इंडियाचे उपाध्यक्ष सुधीर इनामदार,लिनवे एनर्जीचे संस्थापक श्रीरंग चांदेकर,पोड्रॉंस चे सीईओ अनिल गुप्ते,ॲग्रोस्टारचे अक्षय हळबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी सेवाभावी संस्थेचे विश्वस्त चारुदत्त बोधनकर यांनी तर स्वागत संचालक डॉ सतीश वरपडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राजक्ता गाजरे तर आभार समन्वयक डॉ गणेश पाठक यांनी मानले. दुसऱ्या दिवशी मनुष्यबळ विकास संसाधन” या विषयावर परिषदेचे आयोजन केले होते.या परिषदेमध्ये सागर देशपांडे, डॉ प्रीती मुळे, नचिकेत खरे,निलेश जोगळेकर,घनश्याम इंगळे,निशिकांत दीक्षित, डॉ निलेश चौहान हे सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ मनिषा पुरोहित,डॉ राजेश गाडे,देवांग जोशी,विवेक केसकर,डॉ अनिल पोमण, डॉ सुदर्शन बाबर,डॉ धनंजय देशपांडे,तुषार पोखर्णीकर,सुनील प्रजापती, रजनीकांत धमाल यांनी विशेष परिश्रम घेतले.




