केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची लोणावळ्यातील प्रलंबित आणि केंद्राशी निगडित प्रकल्पसाठी आढावा बैठक




मावळ मराठा न्यूज-लोणावळा,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्राशी संबंधित रखडलेल्या प्रकल्पाना गती मिळावी, त्या प्रकल्पना केंद्र आणि राज्यातून निधी मिळावा यासाठी नुकतीच आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रयत्नातून सर्व पक्षांना एकत्रित करुन शहराच्या सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील प्रमुख १० प्रलंबित आणि केंद्राशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यासाठी संबंधित खात्याचा केंद्रीय मंत्र्यांचि भेट घेऊन दिल्लीत त्या संधर्भात बैठक घेऊन लोणावळ्याला जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मीं प्रयत्न करीन असे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी लोणावळेकरांना दिले.यावेळी जो पर्यंत पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो पर्यंत या आतंकवादी कारवाया सुरूच राहतील त्यापेक्षा माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी पाकिस्तानला पाक व्याप्त काश्मीर सोडण्याबाबत सांगावे व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात थेट युद्ध पुकारावे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात नगरपरिषद शहर विकास आढावा बैठकीत व्यक्त केले. या आढावा बैठकीला हंगामी मुख्याधिकारी तथा प्रशासक अंकुश जाधव,माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी नगराध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, आरपीआयचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, भाजपा लोणावळा अध्यक्ष अरुण लाड, शिवसेना लोणावळा अध्यक्ष संजय भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अध्यक्ष नासिर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अध्यक्ष विलास बडेकर, नारायण पाळेकर, दत्तात्रेय येवले, आरोही तळेगावकर,बाळासाहेब जाधव,बिंदा गणात्रा,धीरूभाई कल्याणजी,यमुना साळवे,मालन बनसोडे,गणेश गायकवाड आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.




