पुणे ग्रामीण,जिल्हा पोलिस,लोणावळा उपविभाग आयोजित “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” अंतर्गत दर आठवड्याला स्वच्छता मोहीम

मावळ मराठा न्यूज,लोणावळा,अवैध व बेकायदेशीर धंदयांची साफ सफाई सोबतच सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क वाढवणारा कर्तव्य दक्ष अधिकारी आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी नागरिकांसोबत पोलिसांचे चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे नाते निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्राची आराध्य कुलस्वामिनी श्री एकवीरा आई मंदिर परिसर येथे स्वच्छ्ता मोहीम राबविनार आहे. त्यानंतर गड किल्ले पर्यटन स्थळ येथे देखील स्वछता मोहीम ते राबविणार आहेत.त्यात ते महाविद्यालयीन विद्यार्थ्याना वाहतूक नियम,व इतर जन जागृती करणार आहेत. तसेच यात पोलिसांसह सामाजिक संस्था,वकील,पत्रकार,समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा त्यांचा मानस आहे. जून महिन्यात जन जागृती प्रभात फेरी काढण्याचा मानस त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस श्री सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतुन श्री एकविरा देवस्थान परिसरातील स्वच्छता मोहीम बुधवार दिनांक २६/४/२०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता आयोजीत केली आहे. सदरचे स्वच्छता मोहीमेस पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. सदरचे स्वच्छता मोहीमेत मौजे वेहेरगाव येथील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केलेले आहे. सहभागी नागरिकांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागाबद्दल प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्वच्छ्ता मोहिमेत भाग घ्यावा असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page