लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्दीतील अवैध दारू धंद्यावर धडाकेबाज कारवाई

मावळ मराठा न्यूज : लोणावळा,लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे एक अनुभवी,कार्यक्षम असे अधिकारी आहेत.ग्रामीण पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे आणि कर्मचारी खूप कमी असताना त्यांची ही कामगिरी खरोखर कौतुकास्पद आणि वाखनण्यागी आहे. त्यांना लाभलेले मार्गदर्शन आय पी एस सत्य साई कार्तिक हे देखील कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा खूप कमी वेळात आपला कामाचा ठसा उमटवला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील डी बी पथकातील अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळवत २६ मे रोजी लोणावळा ग्रामीण हद्दीतील वेहरगाव येथील देवकर वस्ती आणि कनजारभट वस्ती येथे छापा घालून गावठी हातभट्टी तयार करण्याचे चोवीसशे लिटर कच्चे रसायन व साधने असा १ लाख वीस हजार रुपयांच्या माल प्राथनाबेन मेघराज राजपूत वय ३४, राहणार कांजार भटवस्ती यांचे कडून जप्त केला आहे लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली,तश्याश प्रकारची कारवाई औंढे येथे १०५ लिटर गावठी हात भट्टी ची तयार दारू आणि साधने असा १० हजार रुपये किमतीचा माल तेजस्विनी राजपूत राहणार दत्तवाडी, कुसगाव,तसेच पवनानगर येथे छापा टाकून ३ हजार रुपयांच्या किमतीची देशी, विदेशी दारू अमर सुनील राठोड,राहणार कडधे यांच्या कब्जातून जप्त केली. भविष्यात अशी अवैध धंदे हद्दीत खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिला आहे.सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,पोलीस उप पोलीस निरीक्षक भारत भोसले,पोलीस हवालदार सीताराम बोकड, विजय गाले, पुष्पा घुगे,किशोर पवार ,केतन तळपे,राहुल खैरे ,निखिल पंडित , कमथनकर,होमगार्ड आनंद शिर्के यांनी केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page