“स्वभाव राशींचे “कार्यक्रम प्राधिकरणात रंगला*







मावळ मराठा न्युज -प्राधिकरण निगडी -दिनांक २२ ऑगस्ट रोजी श्री समर्थ युवा प्रतिष्ठान व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त श्री. विश्वास पटवर्धन प्रस्तुत “स्वभाव राशींचे” हा कार्यक्रम वाढोकर सभागृहात संपन्न झाला.
निमंत्रक श्री.अमित राजेंद्र गावडे (नगरसेवक पिं.चिं. मनपा) प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी यांनी अध्यक्ष स्थान भूषविले.
मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर, श्री अमित गावडे यांनी प्रास्ताविक केले.यामध्ये ज्येष्ठांचा अनुभव,प्रेरणा,आदर करण्याचा दिन तसेच त्यांचा आजपर्यंतचा प्रवास,शिकवण याचा सन्मान करण्याचा दिवस असे नमूद केले.
सौ. वृषाली गुर्जर यांनी श्री.विश्वास पटवर्धन यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.प्राधिकरण ज्येष्ठष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोशी यांचा परिचय सौ वृषाली गुर्जर यांनी करून दिल्यानंतर श्री.अमित गावडे यांनी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला , तसेच श्री.अमित गावडे यांचाही सत्कार , ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी शाल व श्रीफळ देऊन केला.
श्री. चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या मनोगतात संघाच्या वाटचालीचाआढावा घेतला तसेच , प्रमुख वक्ते आणि अमित गावडे यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या.
श्री. विश्वास पटवर्धन यांनी सुंदर अशा चारोळीतून कार्यक्रमाला सुरुवात केली.बारा राशींचे वर्णन व ते गुणधर्म असणारे स्त्री व पुरुष तसेच मोठमोठ्या व्यक्तींची उदाहरणं , चारोळी / कवितेच्या माध्यमातून उलगडून सांगितलं . त्यामुळे सतत हास्याचे फवारे उडत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सौ.ज्योती कानेटकर यांनी केले.श्री.दिलीप गोसावी उपाध्यक्ष यांनी आभारप्रदर्शन केले .



