लोणावळा नगरपरिषद व संत निरंकारी संस्था यांचा संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिना निमित्त विशेष स्वच्छता मोहीम आणि वृक्षरोपण




मावळ मराठा न्यूज :-लोनावला,आज दि ५/०६/२०२३ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लोणावळा नगरपरिषदेच्या व संत निरंकारी संस्थेच्या वतीने लोणावळा शहरात सर्व ठिकाणी मोठया प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच रायवूड उदयान येथे २०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये संत निरंकारी संस्थेचे २००० स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच लोणावळा नगरपरिषदेचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्याधिकारी श्री.पंडीत पाटील यांनी ५ जून २०२३ बाबत पर्यावरणाचे शुभेच्छा दिल्या. तसेच नगरपरिषदेचे कार्यालय अधिक्षक शरद कुलकर्णी, स्वच्छता विभागप्रमुख दत्तात्रय सुतार यांनी सर्व कार्यकर्ते व कर्मचा-यांचे व कचरा उचलणे बाबतचे नियोजन केले. तसेच उदयान विभागामार्फत झाडे उपलब्ध करुन देण्यात आली.




