शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या दोन शाखेंचे उद्घाटन


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,शिवसेना शाखा डोंगरगाव शाखा व वेताळनगर शाखेचे उद्घाटन कार्यक्रम शिवसेना संपर्कप्रमुख आमदार मा श्री सचिनभाऊ आहिर, शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार ॲड गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, संपर्कप्रमुख मावळ प्रभाकर पवार, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना मावळ तालुका सल्लागार मारूती खोले, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालायावेळी बोरज ग्रामपंचायत सदस्य संतोष केदारी व सहकारी व डोंगरगाव वेताळनगर येथील युवकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी डोंगरगाव ग्रामपंचायत चे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुनील येवले यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन सचिनभाऊ आहिर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका संघटक अशोक निकम, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे,नगरसेवक शिवदास पिल्लै,सरपंच सुनिल येवले, दत्ताभाऊ भेगडे, शंकर भेगडे, विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, उपसरपंच स्मिता सुभाष खोले, विभाग प्रमुख भगवान देशमुख, संजय शिंदे, संघटक सुभाष डेनकर, शिवसेना डोंगरगाव शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन पंकज खोले, सुभाष खोले व डोंगरगाव येथील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी केले




